उत्राण अ.ह.तंटामुक्ती अध्यक्ष पदी खलील शेख तर उपाध्यक्षपदी भागवत सोनवणे
उत्राण ता.एरंडोल
दिनांक 26/01/2024 रोजी उत्राण अ. ह. तालुका एरंडोल येथील गणतंत्र 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत मधील ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून उत्राण अ.ह. परिसरातील नावलौकिक असलेले ज्येष्ठ समाजसेवक , शेख खलील शेख वजीर यांची सर्वांन मते तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तसेच उपाध्यक्षपदी सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी.भागवत श्रवण सोनवणे यांची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की शेख खलील शेख वजीर यांनी आतापर्यंत गोर,गरीब जनतेस त्यांच्या हिताचे असलेले योग्य न्याय मिळवून दिले तरी असे परिसरातले उत्राण.अ.ह. येथील रहिवासी शेख खलील शेख वजीर यांची मोठ्या आनंदाने व उत्साहाने निवड करून त्यांच्या सत्कार करण्यात आला. उपसरपंच हरून भैया देशमुख व भागवत भिकन पाटिल(माजी पंचायत समिती सदस्य ) आनंद आसाराम धनगर( मा जी, कृषी उत्पन्न बाजार समिति संचालक धरणगांव) डी.वाय.एस.पी. भागवत श्रावण सोनवणे व तसेच प्रहार चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील व गावातील समस्त नागरीकांनी यावेळी शुभेच्छा दिल्यात.