पाचोरा तालुक्यातील हिवरा धरणाचा कॅनल फुटल्या ने लाखो लिटर पाण्याची नासाडी :पंधरा गावे संकटात येणार
दोषी कर्मचारींवर कारवाई ची कॉंग्रेस केली मागणी
पाचोरा –
तालुक्यातील खडकदेवळा येथील हिवरा मध्यम प्रकल्पाचा डावा कालवा फुटल्या ने पाणी चे आवर्तन बंद करण्याच्या प्रयत्नात दरवाजे नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असुन या घटनेतील दोषींवर कारवाई ची मागणी कॉंग्रेस ने केली आहे
हिवरा मध्यम प्रकल्पात पाणी साठा पुरेसा नसतांना देखील उजवा आणि डाव्या कालव्याच्या पाटचारी मध्ये घाईघाईत वरीष्ठ अधिकारींना चुकीची पाणी साठ्याची माहिती देवुन पाणी सोडण्यात आले या पाण्याचे नियोजन करण्यात आले नव्हते त्यातच पाठी साठा कमी शिल्लक राहिलेने पाण्याचा दाब कमी होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यां पर्यंत पाणी पोहचु शकले नाही यातच काल रात्री अचानक धरणाच्या बाजुला असलेल्या डाव्या कालवा फुटल्या ने ग्रामस्थांनी प्रकल्पातील जबाबदार कर्मचारी यांना तातडीची सुचना केली यावरुन सदर कर्मचारी यांनी दरवाजे बंद करण्या ऐवजी उघडण्याची प्रक्रिया झाल्यावर पाणी चा प्रवाह जोरात सुरू झाल्यानंतर लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असतांना ग्रामस्थ उघड्या डोळ्यांनी पाणी वाहताना बघत होते लघु पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी नॉटरीचबल होते अशात कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना खडकदेवळा ग्रामस्थांनी घटनेची माहिती दिली श्री सोमवंशी यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी भुषण अहीरे यांना कळवले असतां त्यांनी नायबतहसिलदार बी डी पाटील, तलाठी श्री बागुल सह मॅकेनिकल व पथक रवाना केली असता नवीन गेट तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते आता लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असुन याचे अॉडीट व्हावे व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी उपविभागीय अधिकारी भुषण अहीरे यांच्या कडे केली आहे.