Blog

नाशिक!अबंड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या.

नाशिक-

नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात आज सकाळी धक्कादायक घटना घडली. पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक नजन यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. नजन यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, याप्रकरणी पोलीसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे सहायक प्रशांत बच्छाव यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक नजन हे सकाळी त्यांच्या कॅबिनमध्ये बसले होते. त्यावेळी अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला. यानंतर ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कॅबिनच्या दिशेने धाव घेतली. यावेळी नजन यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली.

अशोक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालायात पाठवण्यात आला.अशोक नजन यांच्या कुटुंबाला याबाबत माहिती देण्यात आली.या घटनेनंतर अशोक यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नजन यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!