जळगाव जिल्हा

जाहीर नोटिस


तमाम लोकांना वित्तीय संस्था, बँक, शासकिय व निमशासकिय कार्यालय तथा अधिकारी यांना व १) भारत विठ्ठल गायकवाड, रा. तलाठी कॉलनी श्रध्दा मार्वलच्या बाजुला भडगांवरोड पाचोरा, ता. पाचोरा जि. जळगांव व २) दत्तात्रय विठ्ठल गायकवाड, रा. पिंपळगांव हरे, ता. पाचोरा जि. जळगांव. यांचा व त्यांचे वाली वारस यांना आमचे अशिल विजया रामदास जाधव रा. गाडगेबाबा नगर जुना अंतुर्ली रोड पाचोरा, ता. पाचोरा जि.जळगांव यांचेतर्फे या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यांत येते की,

१) मिळकतीचे वर्णन :-

अ) तु.जि. जळगांव पो.तु.ता.पाचोरा पैकी मौजे पिंपळगांव बु.।ा शिवारातील बिन शेत गट नं. १७६/१, ही ही भारत विठ्ठल गायकवाड, रा. तलाठी कॉलनी श्रध्दा मार्बलच्या बाजुला भडगांवरोड पाचोरा, ता. पाचोरा जि. जळगांव यांचे नावे असुन सदर मिळकतीत एकुण एन.ए. प्लॉट नं. १ ते २८ असे पाडण्यात आलेले असुन सदरची मिळकत ही आमचे अशिलांची व इतर वारसांची वडिलोपार्जित शेतमिळकत आहे.

ब) तु.जि.जळगांव पो.तु.ता.पाचोरा पैकी मौजे पिंपळगांव बु.।। शिवारातील बिन शेत गट नं. १७६/२ ही दत्तात्रय विठ्ठल गायकवाड, रा. पिंपळगांव हरे, ता. पाचोरा जि. जळगांव यांचे नावे असुन सदर मिळकतीत एकुण एन.ए.प्लॉट नं. १ ते ३८ असे पाडण्यात आलेले असुन सदरची मिळकत ही आमचे अशिलांची व इतर वारंसांची वडिलोपार्जित शेतमिळकत आहे.

येणे प्रमाणे शेतमिळकती आमचे अशिलाचे वडीलोपार्जित असुन सदर मिळकतीच्या कायदेशिर हक्क व अधिकारापासुन आमचे अशिल व इतर वारसांनी कोणताही हक्क व अधिकार वा इतर कोणत्याही प्रकारचा हक्कसोड दस्त करून दिलेला नाही. वरील दोघांनी इतर वारसांच्या गैरहजेरीत नोंद बेकायदेशिरीत्या करून घेतलेली आहे. सदर मिळकतींना आमचे अशिल व इतर कायदेशिर वारस असतांना त्यांना वारस न लावता बेकायदेशिर वारसांची नोंद करून घेतलेली आहे..

वर नमुद केलेल्या मिळकती हया १) भारत विठ्ठल गायकवाड२) दत्तात्रय विठ्ठल गायकवाड, हे त्रयस्त इसमास विक्री करण्याच्या विचारात आहेत असे आमचे अशिलांना नुकतेच कळाले आहे. सदर मिळकती हया वडीलोपार्जित असल्याने त्या मिळकतींमध्ये आमचे अशिल व इतर वारसांचा कायदयाने हक्क व अधिकार आहे सदर मिळकती विकी करण्याच्या त्यांना कोणताही काहीएक अधिकार नाही, सदर शेतमिळकतीं मध्ये आमचे अशिल व इतरांचा देखील हक्क व अधिकार आहे म्हणुन १) भारत विठ्ठल गायकवाड२) दत्तात्रय विठ्ठल गायकवाड, यांचेशी कुणीही कोणताही खरेदी, विकी, तारण, गहाण वा इतर कोणत्याही प्रकारचे हस्तांतरणाचा व्यवहार करून नये केल्यास तो आमचे अशिल व इतरांवर बंधकनकारक राहणार नाही करिता सदरची जाहीर करणे भाग झाले आहे.

सदरची जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १) भरत विठ्ठल गायकवाड२) दत्तात्रय विठ्ठल गायकवाड, यांचेशी कोणताही खरेदी विक्री अथवा कोणत्याही प्रकारचा हस्तांतरणाचा व्यवहार करू नये केल्यास तो आमचे अशिलांवर बंधनकार राहणार नाही. याची नोंद घ्यावी या करीता सदरची जाहीर नोटीस देणे भाग झाले आहे.

येणे प्रमाणे सदरची जाहीर नोटीस पक्षकाराने दिलेल्या माहीती, सुचना व अधिकाराने आमचे मार्फत प्रसिध्द केली आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!