पतीला खूप प्रेम दिले, आता लेकीलाही आशीर्वाद द्या!वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासाठी कमलताई पाटील यांचे भावनिक आवाहन
भडगांव–
भडगांव तालुक्यातील जनतेने माझे पती स्व.आर.ओ. तात्या पाटील यांना भरभरून प्रेम दिले असून आता माझ्या लेकीलाही जनतेने आशीर्वाद द्यावा असे आवाहन श्रीमती कमलताई पाटील यांनी केले. त्या “गाव तिथे शाखा” या उपक्रमाच्या अंतर्गत भडगांव तालुक्यातील शिवसेना-उबाठा पक्षाच्या विविध शाखांच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होत्या.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सौ.वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी “गाव तिथे शाखा” या उपक्रमातून गावोगावी जनसंपर्क अभियान सुरू केले असून याला पाचोरा भडगांव दोन्ही तालुक्यांमधून अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. यात वैशालीताई यांच्या सोबतीला त्यांचे कुटुंबिय देखील सहभागी होत आहेत. यात आज त्यांच्या मातोश्री श्रीमती कमलताई पाटील यांनी भडगाव तालुक्यातील खेडगाव, शिंदी, पिंप्रीहाट, कोळगाव, जुवार्डी, अडाळसे, गुढे आणि वडजी या गावांमधील शिवसेना-उबाठा पक्षाच्या शाखांचे उदघाटन केले.
यातील प्रत्येक गावात श्रीमती कमलताई पाटील आणि सहकार्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी उपस्थितांनी दिवंगत आर.ओ. तात्यांच्या आठवणींना उजाळा देत वैशालीताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली. तर तात्यांप्रमाणेच जनतेने माझ्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
याप्रसंगी श्रीमती कमलताई पाटील यांच्या सोबत दिपक पाटील शंकर मारवाड़ी, योजनाताई पाटील, जे के पाटील, माधव जगताप, चेतन पाटील, गोरख दादा, विजय साळूखे, पप्पु दादा, रतन दादा, नवल परदेशी, भुषन पाटील, भाऊसाहेब पाटील, रीतेश सोनवणे, मछिंद्र आबा, शरद पाटिल, अशोक बापू, सुरेश पाटिल, भास्कर भाऊ, श्याम पाटील सर, नाना सुखदेव महाजन, भाऊसाहेब पाटील, पप्पूदादा पाटील, प्रकाश आबा पाटील, शांताराम पाटील, मनोहर महाले, पप्पू महाजन, समाधान पाटील, प्रवीण पाटील शिंदी, संदीप पाटील, नरेश आबा पाटील, सतीश आबा पाटील, तुकाराम महाराज, महेंद्र माळी, गणेश पाटील, फकीरा पाटील, राजू मोरे, प्रवीण पाटील पिंप्री हाट आदींची उपस्थिती होती.