आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा;पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या रिक्षाचालकांना सुचना.

पाचोरा-
आगामी काळात होवु घातलेल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा. अशा सुचना २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आयोजित रिक्षाचालकांच्या पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी पाचोरा शहरासह तालुक्यातील रिक्षाचालकांना दिल्या आहेत. यावेळी पोलीस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे, गोपनीय शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल सुनिल पाटील, राहुल बेहरे उपस्थित होते.
राजकीय पक्षांचे किंवा राजकीय पदाधिकारी यांचे पोस्टर लावलेले असल्यास ते तात्काळ काढुन घ्यावे, मद्य प्राशन करुन रिक्षा चालवु नये, रहदारीस कुठलाही अडथळा निर्माण होवु नये याची दक्षता घ्यावी, रिक्षांवर भोंगे अथवा लाऊडस्पिकर लावु नये आवश्यक असल्यास पोलिस प्रशासनाची परवानगी घ्यावी यासारख्या महत्त्वाच्या सुचना पो. नि. अशोक पवार यांनी रिक्षाचालकांना दिल्या आहेत. या बैठकीत पाचोरा शहरासह तालुक्यातील रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.