पाचोरा १६ मे डेंग्यू दिवसा निमित्ताने मागदर्शन व जनजागृती
पाचोरा-
आज 16 मे 2024 राष्ट्रीय डेंग्यू दिवस असून पाचोरा शहरात डॉ देशमुख साहेब जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे तसेच ग्रामीण रुग्णालय पाचोरा डॉ. सतीश टाक वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1 श्री व्ही पी राठोड आरोग्य पर्यवेक्षक पाचोरा भडगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती हस्त पत्रके वाटप डास उत्पत्ती स्थानकांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले.
तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले. साठवून ठेवलेल्या पाण्याची भांडी तपासण्यात आले. दूषित कंटेनर मध्ये डास अळीनाशक औषध टाकण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी गृहभेटी देऊन लोकांना डेंगू आजाराविषयी काळजी घेणे विषयी पुढील प्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले. डेंग्यू आजारासाठी लोकांचा सहभाग असणे गरजेचे आहे डेंग्यू चा डास हा स्वच्छ पाण्यावर अंडी घालतात . त्यासाठी आपल्या घरातील स्वच्छ पाण्याचे भांडी माठ रांजण पाण्याच्या टाक्या सात दिवसातून एकदा स्वच्छ घासून पुसून कोरडी करून ठेवण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच डेंग्यू आजाराचे लक्षणे आढळून आल्यास अंग दुखी तीव्र स्वरूपाचा ताप डोकेदुखी या प्रकारे लक्षणे आढळून आल्यास आपल्या रक्ताची तपासणी करून घेणे. याप्रकारे डेंग्यू आजाराविषयी मार्गदर्शन जनजागृती करण्यात आले