क्राईमजळगाव जिल्हा

मोबाईल चोरटे पाचोरा पोलिसांच्या ताब्यात; मोबाईल सह गुन्ह्यात वापरलेली रिक्षा केली हस्तगत,डि.बी.अंमलदाराची उत्कृष्ट कामगिरी


पाचोरा-

दिनांक 17/05/2024 शुक्रवार रोजी दुपारी 02:30 वाजेच्या  पूर्वी फिर्यादी नामे श्रीराम रेवननाथ जोशी, (वय-40) धंदा. वृत्तपत्र विक्रेता, रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजी नगर हे पाचोरा बस स्थानक येथुन पाचोरा ते सुरत बसने धुळे येथे जात असतांना सदरच्या बसमध्ये त्यांचा कोणीतरी पॅन्टचे खिशातून त्यांचा मोबाईल चोरुन नेला. तसेच ते बसच्या खाली उतरुन मोबाईल शोधत असतांना साक्षीदार नामे 1) तारकेश राजेंद्र पाटील, रा. गजानन नगर, जळगांव 2) शंतनु प्रकाश भालेराव, रा. कुऱ्हाड, ता. पाचोरा असे यांचे एकुण 03 मोबाईल एकुण 32,000/- रुपये किंमतीचे बसस्थानक परिसरातुन चोरीस गेले बाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गु.र.क्रमांक 240/2024 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे फिर्याद दिनांक 17/05/2024 रोजी सायंकाळी 05:42 वा. दिली होती.

सदर गुन्ह्यांचे अनुषंगाने पाचोरा पोलिस स्टेशनचे डी.बी. अंमलदार पोहेकॉ/625 राहुल शिंपी, पोकॉ/1230 योगेश सुरेश पाटील, पोकों/1997 योगेश अरुण पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज व गुन्ह्यांचे तांत्रीक विश्लेषणाचा आधारे तसेच गुन्ह्यांचा तपास चालु असतांना संशयीत इसम हे बसस्थानक परीसरात एका रिक्षात असुन फिरत असल्याची  गुप्त माहिती बातमीदाराने पोहेकॉ/625 राहुल शिंपी यांना  दिल्याने त्या बातमीचा आधारे त्यांना जारगांव चौफुलीच्या पुढे, रोडचा डावे बाजुला आरोपी नामे 1) नाजीम मोहम्मद पठाण, वय. 32 वर्षे, रा. राजमालती नगर, रुम नं. 10, विकास डेअरी जवळ, दुध फेडरेशन जवळ, जळगांव 2) अमजद रशीद शेख, वय. 33 वर्षे, रा. गयबी नगर, प्लॉट नंबर 202, महेमुद अपार्टमेंट, गुलजार नगर, भिवंडी, जि. ठाणे हे रिक्षा क्रमांक एम.एच.-19 सी.डब्लु.-1142 मध्ये बसले होते. सदर आरोपींची अंगझडतीत एकुण 03 मोबाईल 32,000/- रुपये किंमतीचे मिळून आल्याने त्यांना पाचोरा पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांची गुन्ह्यां संदर्भात प्राथमिक चौकशी करता त्यांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करुन त्यांचेकडुन चोरीस गेलेले मोबाईल हे जप्त करुन त्यांनी सदर गुन्ह्यांत वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आलेली असुन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यांचा तपास पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सोो, चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी सोो, श्री. धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार, प्रभारी अधिकारी, पाचोरा पोलीस स्टेशन, पोहेकॉ/६२५ राहुल शिंपी, पोहेकों/२४०९ विश्वास देशमुख, पोकॉ/१२३० योगेश सुरेश पाटील, पोकों/१९९७ योगेश अरुण पाटील, पोकों/७८५ संतोष सुरेश राजपुत यांनी पार पाडली आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!