Blog

कजगाव येथे केळी बागावर बळीराजाने फिरवला रोटाव्हेटर.


कजगाव ता.भडगाव

सध्याच्या तापमानात शेतकऱ्यांना केळी जगवणे कठीण झाले आहे. डोळ्या देखत केळीचे पीक वाळत असल्याने हातलब झालेल्या कजगावच्या शेतकऱ्याने संपूर्ण केळी बागेवर रोटाव्हेटर  फिरवला आहे.
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील शेतकरी रूपसिंग पुना पाटील यांनी तितुर नदीला लागून दीड एकर क्षेत्रात एकूण एक हजार केळीची लागवड केली होती. परंतु एका महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे केळीचा बाग सुकून गेला त्यातच सदरील शेतकरी च्या विहिरीला पाणी नाही हातलब शेतकऱ्याने आपल्या एक हजार आठसे केळीच्या बागेवर रोटाव्हेटर फिरवला आहे. आजपर्यंत हजारो रुपये खर्च झाले असून शेतातील विहिरीवर पाणी आटल्याने काही वेळ बाहेरून पाणी विकत घेऊन केळी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा उपयोग झाला नाही.

तर शेतात लावलेल्या केळीवर  अतिउष्ण तापमानामुळे मोठा फटका बसला आहे.शेतातील विहिरीला पाणी नसल्यामुळे विकत पाणी आणले तरीही बाग वाचू न शकल्याचे दुःख आहे. डोळ्या देखत केळीचा बाग सुकत असल्याने नाईलाजास्तव केळी बागेवर रोटाव्हेटर फिरवावा लागला असून निवडणूका संपल्या असतील बळीराजाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी परिसरातून होत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!