जळगाव जिल्हा

स्टेशनवर धावत्या रेल्वेखाली मारली उडी;प्रेमीयुगलाने उचलले टोकाचं पाऊल,


चाळीसगाव-

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे  येथील प्रेमीयुगलाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास येथील रेल्वेस्थानकाजवळ घडली. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला असून, मुलाचे पाय कापल्या गेल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

बोढरे येथील रिक्षा चालक सचिन गणपत चव्हाण (वय २२) याचे गावातील त्याच्याच जवळच्या नात्यातील शीतल रामसिंग चव्हाण (वय १९) हिच्याशी प्रेमसंबंध होते. दोन्हींनी लग्नाचा विचारही केला होता. मात्र, ते एकाच नात्यातील असल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला.

आपले लग्न होणार नसल्याचे त्यांनी आत्महत्या करण्याचे ठरविले. त्यानुसार दिनांक ६ जुन गुरुवार रोजी रात्री दोही गावातून पळून जात चाळीसगाव गाठले. बोढरे येथे रात्री मुलगी घरी न दिसल्यामुळे तिच्या घरच्यांनी नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, मुलगी कुठेही मिळून आली नाही.
दरम्यान, घरून पळून गेलेले सचिन व शीतल यांनी चाळीसगाव रेल्वेस्टेशनवर येऊन रात्री दीडच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले. यात शीतलचा जागीच मृत्यू झाला. सचिनचा मात्र एकच पाय रेल्वेखाली सापडल्याने तो कापला गेला. रेल्वे निघून गेल्यानंतर सचिनने जखमी अवस्थेत त्याच्या  मोबाईलवरून बोढरेत भावाला फोन करून सांगितले

त्यानंतर त्याच्या नातेवाईकासह इतरांनी चाळीसगावला धाव घेऊन जखमी सचिनला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या दुसऱ्या पायावर शस्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत स्टेशन मास्तरांनी रेल्वे पोलिसांना दिलेल्या माहितीवरून घटनेची नोंद करण्यात आली आहे. हवालदार गोपालकृष्ण सोनवणे या बाबत तपास करीत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!