जळगाव जिल्हा

विज पडून बैल जागीच ठार;शेतकरी कुटुंब बचावले पाचोरा तालुक्यातील घटना

पाचोरा-

यावर्षी सात जून पासून वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असून या वादळीवाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी, मोसंबी, आंबा व इतर उन्हाळी पीकांचे आतोनात नुकसान झाले आहे. अशातच दिनांक ०९ जून २०२४ रविवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसात पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील शेतकरी काशीनाथ दौलत पाटील यांच्या मालकीच्या गोलबर्डी शिवारातील शेतात बांधलेल्या बैलावर विज पडून त्यात बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून यात अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील शेतकरी काशीनाथ दौलत पाटील यांची शेतजमीन गोलबर्डी शिवारात असून त्यांनी याच शेतात शेती अवजारे व गुरेढोरे बांधण्याची व्यवस्था केली आहे. काल दिनांक ०९ जून २०२४ रविवार रोजी शेतात काम करत असतांनाच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. म्हणून त्यांनी लवकरात, लवकर कामकाज आटोपून सायंकाळी साडेसहा वाजता बैलजोडी बांधून पत्नी, मुलाबाळांसह घराकडे निघाले असतांनाच बांधलेल्या बैलांपासून काही अंतरावर असलेल्या एका छताखाली थांबले असतांनाच अचानकपणे मोठ्याने विचेचा कडकडाट झाला व डोळ्यासमोर लख्ख प्रकाश पडला यावेळी सर्व कुटुंबीयांनी घाबरुन एकमेकांना मिठीत घेतले. तदनंतर थोडे भानावर आल्यावर सर्व सुरक्षित आहेत म्हणून मनोमन देवाचे आभार मानले. कारण बैल बांधल्यावर जर त्याच ठिकाणी सर्व थांबले असते तर मोठा अनर्थ ओढवला असता अशी माहिती शेतकरी काशीनाथ पाटील यांनी दिली.

मात्र याच वेळी बांधलेल्या बैलजोडी कडे पाहिले असता एक बैल जमीनीवर पडलेला दिसून आला म्हणून त्यांनी बैला जवळ जाऊन पाहिले असता बैल मृत झाल्याचे लक्षात आले यावेळी त्यांनी आसपास पाहिले असता जवळच असलेल्या हिरव्यागार वृक्षाच्या काही फांद्या जळालेल्या दिसल्या हे पाहून विज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची खात्री पटली. म्हणून त्यांनी गावात येऊन ही घटना गावकऱ्यांना सांगितली  ही घटना माहित पडताच आज सकाळी कुऱ्हाड खुर्द सजेचे तलाठी नकुल काळकर व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश पाटील यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!