वायबसे कुटूंबाची भेट घेत सांत्वन;आत्महत्या थांबवा अन्यथा मी राजकारण सोडून देईल-पंकजा मुंडे
बीड-
पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्या समर्थकांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती आत्महत्या केलेल्या कुटुंबांची पंकजा मुंडे यांनी भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्या समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. या आत्महत्या केलेल्या कुटुंबांची पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. यावेळी मृतांच्या कुटुंबियांना पाहून पंकजा मुंडे यांनाही अश्रु अनावर झाल्याचे बघावयास मिळाले.
लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीडच्या आष्टी तालुक्यातील इंदेवाडी आणि डिघोळआंबा येथील तरुणाने आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त कुटुंबांची पंकजा मुंडे यांनी भेट घेतली.
यातील चिंचेवाडी येथील वायबसे कुटूंबाची भेट घेत मुंडेंनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी पंकजा मुंडे यांना पाहताच कुटूंबियांनी टाहो फोडला. तर पंकजा मुंडे यांनाही अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला बोलतांना ते म्हणाले कि, आता आत्महत्या करू नका, तर मला लढण्यासाठी बळ द्या, असे समर्थकांना आवाहन केले आहे.
तसेच जर आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले, आगामी शंभर दिवसात हे सगळे चित्र बदलून टाकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.