जळगाव जिल्हा
डॉ.नुरुद्दीन मुल्लाजी यांना खांन्देशी स्टार पुरस्कार
कासोदा-
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ नुरुद्दीन मुल्लाजी यांना मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था व हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने खांन्देश स्टार सन्मान सोहळा 2024 राज्यस्तरीय खान्देशी स्टार पुरस्कार बहाल करण्यात आला. पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेत, व त्यांची नेत्र दीपक कामगिरी पाहता त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. पाकीजा पटेल , महापौर जयश्रीताई महाजन, सौ नीता ताई सोनवणे, यांच्या उपस्थित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
श्री मुल्लाजी यांना हा 94 वा पुरस्कार आहे त्यांच्या कार्याला त्यांच्या मित्रमंडळींनी व सहकारी व राजकीय पत्रकार मित्रांनी त्यांना 100 पुरस्कार मिळावे अशी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे .