जळगाव जिल्हा

गणराज स्पोर्ट्स अकॅडमी पाचोरा तालुका तायक्वांदो असोसिएशन खेळाडूंनी कलर बेल्ट परीक्षेत यश संपादन


पाचोरा-

विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे देणाऱ्या पाचोरा येथील गणराज स्पोर्ट्स अकॅडमी च्या खेळाडूंनी तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षेत उज्वल यश संपादित केले .  आज दिनांक 23 रोजी पाचोरा तालुका तायक्वांडो असोसिएशन व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने  सचिव अजित घारगे  यांच्या प्रमुख उपस्थितीत तायक्वांडो कलर  बेल्ट प्रात्यक्षिक  परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते . या तायक्वांडो कलर बेल्ट परिक्षेत ३५ खेळाडूंनी यशस्वीपणे तायक्वांडो कलर बेल्ट परीक्षेत यश संपादन केले .
आज स्पर्धेच्या युगात मुला – मुलींसाठी  स्वसंरक्षण काळाची गरज बनली आहे . मुला -मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे गणराज स्पोर्ट्स ॲकडमी त दिले जात असून मोठ्या संख्येने शहरी भागातील खेळाडू लाभ घेत आहेत . १० वी बोर्ड परीक्षेत खेळाडूंचे गुण ग्राह्य धरले जात असल्याने विद्यार्थ्यांना फायदा होतो . सैन्य भरती , पोलीस भरती तसेच शासकिय नोकरीतही खेळाडूंना विशेष सवलत मिळते त्यामुळे या खेळांकडे विद्यार्थी – पालकांनी सजगपणे पाहावे असे आवाहन सुनिल मोरे यांनी केले .
जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे , यांच्या हस्ते  प्रमाणपत्र गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले

असे आहेत गुणवंत विद्यार्थी

यलो बेल्ट
हर्ष सुतार ,शर्वरी गरुड ,
रेवती देशमुख , घनश्याम पाटील ,
हर्षदा पाटील, ऋतुजा काळे ,
शंभू जैन ,समृद्धी बागुल , सम्यक बागुल
गार्गी आगळे ,लीना निकम ,
पुष्पराज पाटील ,कौस्तुभ महाजन ,
धर्य जोशी ,आरव सोनवणे ,
तन्वी पाटील ,प्रितेश निकम ,
दर्शन गुजर ,स्वराज मोरे ,
गौरी पाटील ,देवीश्री गायकवाड ,
समृद्धी राठोड ,प्रथमेश पाटील ,
आर्यन राजपूत ,आर्वी लेंडवे ,
ऋतुराज काळे ,

ग्रीन बेल्ट
नील सोनवणे ,कौस्तुभ बोरसे ,
प्रणव पाटील ,स्वराली कदम ,
आराध्या ओझा ,श्रेयशी दोडे ,
मधुरा बर्वे ,

ब्लू बेल
यश सोनवणे ,प्रणय कदम ,
क्षितिज बोरसे,

सर्व  गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!