हरीभाऊ पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघ जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड
नाशिक-
दिनांक 23/06/2024 रोजी नाशिक येथे अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.राजेंद्र कोढंरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 2024 ह्या कार्यक्रमास पाचोरा येथील मराठा समाज बांधव श्री . हरिभाऊ तुकाराम पाटील,प्रा.श्री.राकेश सोनवणे सर, श्री.मनोज पाटील, श्री.यशोदिप पाटील सर, श्री.किरण देवरे यांनी उपस्थिती दिली वरिल समाज बांधवांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले त्यानंतर वरिल सर्व समाज बांधवांना जळगांव जिल्ह्यात समाजाच्या कामाची जबाबदारी अखिल भारतीय मराठा महासंघांचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा.श्री.प्रमोदराव जाधव साहेब तसेच नाशिक जिल्हाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांतजी बनकर साहेब यांच्या हस्ते श्री.हरिभाऊ पाटील यांना जळगांव जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली, श्री.मनोज पाटील यांना रावेर लोकसभा युवक जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली,प्रा.राकेश सोनवणे यांना जळगांव जिल्हा संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली श्री.यशोदिप पाटील सर यांना रावेर लोकसभा जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली श्री.किरण सुरेंद्र देवरे यांना पाचोरा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक यांच्या तर्फे करण्यात आले