गुजरात मधील कॉन्ट्रॅक्ट किलर स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून अटक
जळगाव-
दिनांक ०८/०६/२०२४ रोजी सुरत येथील उमरपाडा पो.स्टे.०२४३/२०२४ भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे अफजल अब्दुल शेख व त्याचा साथीदार प्रज्ञनेश दिलीप गामीत हे खुन केल्या पासून गुजरात राज्यातून फरार झाले होते. त्यांच्या मार्गावर त्यांना पकडण्याकरीता सुरत पोलीस हे अहोरात्र मेहनत करीत होते.
मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो, जळगाव यांनी श्री. बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना उमरपाडा पो.स्टे.०२४३/२०२४ भा.द.वि. कलम ३०२ या गुन्ह्याची सविस्तर माहिती देवून सदर आरोपीतांचा शोध घेणे बाबत आदेश दिले.
त्याप्रमाणे दिनांक २७/०६/२०२४ रोजी नमुद आरोपीतांचा शोध घेत असतांना पो.ह. अकरम शेख, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, उमरपाडा पो.स्टे.०२४३/२०२४ भा.द.वि. कलम ३०२ या गुन्ह्यातील संशयीत हे अजिंठा चौफुली येथे ट्रकला थांबण्या करीता हात देत असून ट्रकमधून कोठेतरी निघुन जाण्याच्या तयारीत आहेत. त्यावर मा. श्री. बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोलीस उप निरीक्षक श्री गणेश वाघमारे, सफौ विजयसिंग पाटील, पो.ह.सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, सचिन महाजन सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अशांचे पथक हे तात्काळ अजिंठा चौफुली येथे पाठविले. तिथे सदरच्या पथकाने आपली स्वतःची ओळख लपवत सदर इसमांना ताब्यात घेवून त्यांना विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव १) अफजल अब्दुल शेख, वय ३८, रा.उमरपाडा मशिदीजवळ सुरत, २) प्रज्ञनेश दिलीप गामीत, वय २६, रा.तरकुवा डुंगरी फलीया ता.व्यारा जि.वापी असे सांगीतले. सदर आरोपीतांना ताब्यात घेवून अधिक विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, सुरतचे MIM चे खुशीद अली सैय्यद यांनी १६ लाख रु.ची सुपारी दिल्यावरून १) विलाल चांदी, २) अज्जु या दोघांचा गळा कापून जिवेठार मारले आहे अशी हकिगत सांगीतली. सदर आरोपीतांचा पूर्व इतिहास पाहता आरोपी क्र.१ अफजल अब्दुल शेख, वय ३८, रा.उमरपाडा मशिदीजवळ सुरत याच्यावर यापुर्वी सुपारी घेवून ५ खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी क्र. २ प्रज्ञनेश दिलीप गामीत, वय २६, रा.तरकुवा डुंगरी फलीया ता.व्यारा जि.वापी याच्यावर यापुर्वी १५ गुन्हे दाखल आहेत. सदर दोन्ही आरोपी हे सुरत येथील कुविख्यात गुन्हेगार असून त्यांच्या शोधाकरीता गुजरात पोलीसांनी ११ पथके तयार केली
होती. सदर दोन्ही आरोपीतांना पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील पथकास यश आले आहे. सदर गुन्ह्याची कारवाई डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा संदिप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.