राज्य

कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाखाची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा


मुंबई-

मुंबईतील वरळी भागात रविवारी पहाटेच्या सुमारास २४ वर्षीय मिहीर शहा याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून नाखवा दाम्पत्याला उडवले होते. या धडकेत दुचाकीवरील महिला कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या दुर्घटनेत नाखवा कुटुंबीयांची हानी झाली आहे. त्यांचे नुकसान कधीही भरून न येणार आहे. मात्र मानवतेच्या दृष्टीकोनातून सरकारने ही मदत जाहीर केली आहे अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घोषणा केली.

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला घटनेच्या दोन दिवसानंतर मंगळवारी शहापूरमधील एका फ्लॅटमधून पोलीसांनी अटक केली आहे. अपघातानंतर त्याने आपली कार वांद्रे, कलानगर परिसरात सोडली होती, नंबर प्लेटही काढून टाकली होती. त्याने वडील राजेश यांना फोन करून घटनेची माहिती देत फरार झाला होता. अपघाताच्या वेळी आपणच कार चालवत असल्याचे त्याने आपल्या कबुली जबाबात म्हटले आहे आहे. त्यानंतर न्यायालयाने मिहीर शाह याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले.
बीएमडब्ल्यू हिट अँड रनचा मुख्य आरोपी मिहीर शहा याला मुंबईतील स्थानिक न्यायालयाने ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याची कोठडी १६ जुलै रोजी संपणार आहे.

महिलेला अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही लक्झरी कार शिवसेना नेत्याचा मुलगा मिहीर शहा चालवत असल्याचे समोर आले आहे.या घटनेनंतर आरोपीला किती लोकांनी मदत केली आणि त्याला सुमारे तीन दिवस लपून राहण्यास कोणी मदत केली,याचा शोध घेतला जात आहे, असे मुंबई पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
आरोपीकडे कार ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.अपघातानंतर आरोपींनी फेकून दिलेल्या कारची नंबर प्लेट कुठे आहे,याचाही शोध घ्यावा लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिहीर शहा यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, मिहीर आणि ड्रायव्हर दोघांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यांचे फोनही जप्त करण्यात आले आहेत.पोलिसांकडे कोठडी मागण्याचे कारण नसल्याचा दावा त्यांनी केला. मिहीर शहा आणि ड्रायव्हरचे जबाब जुळत असल्याचेही त्यांनी सांगितले. दक्षिण-मध्य मुंबईतील वरळी परिसरात रविवारी सकाळी मिहीर शहा यांच्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!