जळगाव जिल्हा

मतदारसंघात 43 किलोमीटररस्त्यांच्या काँक्रीटीकरण्यासाठी तब्बल 65 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी; आ. किशोर आप्पा पाटील यांचे यश

पाचोरा-


पाचोरा भडगाव मतदार संघातील  विविध रस्त्यांचे अखेर भाग्य उजळले असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत  सुमारे 43 किलोमीटर लांबीच्या दहा  कॉंक्रिटीकरण रस्त्यांसाठी तब्बल 65 कोटी रुपये  मंजूर झाले असून यासाठी  आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार  व्यक्त केले आहेत.
आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये आखतवाडे ते दिघी रस्ता काँक्रिटीकरण करणे भाग लांबी आखतवाडे ते बदरखे फाटा ग्रा.मा.-०९ ,नगरदेवळा ते टाकळी रस्ता काँक्रिटीकरण करणे ग्रा.मा. – ४६,शिंदाड ते वडगाव कडे रस्ता काँक्रिटीकरण करणे  इतर जिल्हा मार्ग -६१,
वरखेडी – सावखेडे ब. – भोजे रस्ता काँक्रिटीकरण करणे इतर जिल्हा मार्ग – ६०, ग्रा.मा. -५५ पिंपरी बु. प्र.- पिंपळगाव – वरसोड तांडा ते जिल्हा रस्ता काँक्रिटीकरण करणे इतर जिल्हा मार्ग – ६०,सामनेर ते प्रजिमा ३० माहेजी रस्ता काँक्रिटीकरण करणे ग्रा.मा. – ४८,सामनेर ते लोणवाडी रस्ता काँक्रिटीकरण करणे ग्रा.मा. – ०५,नेरी – सर्वे खु. सर्वे बु. तालुका हद्द रस्ता हिंगोण रस्ता काँक्रिटीकरण करणे ग्रा.मा. -२०,टोणगाव- भडगाव ते तालुका हद्द लोहटार रस्ता काँक्रिटीकरण करणे  ग्रा.मा. – ९४,रा म मा ७५३ भडगाव ते नाचणखेडा रस्ता काँक्रिटीकरण करणे ग्रा.मा. -१३,या रस्त्यांचा समावेश आहे.दरम्यान दोन्ही तालुक्यातील या महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्या बद्दल पाचोरा  भडगाव तालुक्यातील जनतेसह शिवसैनिकांनी
महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.

प्रतिक्रिया

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी दळणवळण गतीने होणे गरजेचे असते त्यासाठीच रस्त्यांची कामे होणे गरजेचे होते इतरही काही महत्त्वाचे रस्ते मंजुरीच्या प्रतीक्षेत असून लवकरच त्यांचीही मंजुरी घेऊन कामे सुरू करण्यात येतील. थोडा मोठा निधी मंजूर केल्याबद्दल महायुती सरकारचे आभार
किशोर आप्पा पाटील
आमदार पाचोरा भडगाव

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!