समूपदेशन आणि मानसिक आरोग्य विषयावर `यचममुुवि`चा प्रगत पदविका अभ्यासक्रम;कॉन्सिलिंगसाठी विद्यार्थ्यांना रोजगाराची उत्तम संधी
नाशिक-
जगात सर्वत्र मानसिक आरोग्याच्या वाढत्या समस्या लक्षात घेता प्रशिक्षण कॉन्सिलरची आवश्यकता आहे. हे महत्व लक्षात घेता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि शिक्षण प्रभाग, राजयोग शिक्षा आणि शोध प्रतिष्ठान यांच्या वतीने `समूपदेशन आणि मानसिक आरोग्य` विषयावर प्रगत पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या भाकिताानुसार पुढे येणा·या काळात जगातील प्रत्येक शंभर व्यक्तिमागे एक कॉन्सीलरची आवश्यता असेल. अशा वेळी प्रशिक्षीत समूपदेशन अर्थात् कॉन्सिलिंग करणाऱ्या व्यक्तिंची फार गरज पडणार आहे. हे महत्व लक्षात घेता युवकांना, विद्यार्थ्यांना सदर अभ्यासक्रम पूर्ण करुन करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये या अभ्यासक्रमाची केंद्रे आहेत. यासंबंधी अधिकची माहिती आपण www.bkmahaeducation.com या वेबसाईट वरुन घेऊ शकतात असे आवाहन महाराष्ट्र संयोजक प्रा. विकास साळुंखे आणि माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले आहे.