पाचोरा न्यायालयातर्फे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
पाचोरा-
पाचोरा न्यायालयाचे प्रांगणात तालुका विधी सेवा समिती पाचोरा व पाचोरा तालुका वकील संघ पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन श्री. जी.बी. औंधकर साहेब, तालुका विधी सेवा समिती पाचोरा अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क.स्तर पाचोरा यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आले.सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मुख्य न्यायाधीश श्री.जी.बी. औंधकर साहेब, सह न्यायाधीश श्री.एस.व्ही. निमसे साहेब तसेच २ रे सह न्यायाधीश श्रीमती जी. एस. बोरा मॅडम यांच्या न्यायालयातील एकूण २११ इतकी प्रकरणे निकाली होवून त्यात रक्कम रुपये २.६७,६५,६३१/- इतकी वसुली झालेली आहे. त्याचप्रमाणे १६०४ इतके वादपूर्व प्रकरणांचा निपटारा होवून र.रु.१,२३,५३.६१०/- इतका वसुल मिळालेला असून एकूण २.रु.३.९१.१९,२४१/- इतका वसुल मिळालेला आहे.
सदर लोकअदालत यशस्वीतेकरिता श्री. जी. बी. औंधकर, तालुका विधी सेवा समिती पाचोराचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर पाचोरा, लोकन्यायालयाचे पंच अॅड. श्री. तुषार नैनाव, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. श्री. प्रविण बी. पाटील, उपाध्यक्ष श्री. अॅड, मंगेश गायकवाड, सचिव अॅड. श्री. निलेश सुर्यवंशी, सहसचिव अॅड. श्री. अंबादास गिरी, वकील संघाचे सर्व सन्माननीय विधिज्ञ, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेलार मॅडम, पंचायत समितीचे कर्मचारी, ग्रामसेवक, बैंक अधिकारी व कर्मचारी, पाचोरा पोलीस स्टेशन व पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.