अमोल भाऊ शिंदे यांच्या मेळाव्यात वीज खंडित ; मेळाव्यातील कार्यकत्यांनी लावले मोबाईल चा टार्च..
पाचोरा-
भारतीय जनता पार्टी पाचोरा शहराच्या वतीने काल संध्याकाळी रामदेव लाॅन्स येथे कार्यकर्त्यांचा मेळावा अभुतपुर्व उत्साहात संपन्न झाला यात अनेक कार्यकर्त्यांनी समोयोचित मनोगत व्यक्त केले. पाचोरा व भडगाव विधानसभेच्या मागील निवडणुकीत ज्या थोड्याशा फरकाने अमोलभाऊंना जे अपयश आले ते पूर्णपणे व्याजासह परतफेड करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अमोल भाऊंचा विजय करून दाखवू या निर्धाराने प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातील अमोलभाऊ विषयी ऊर्जा दिसून आल्याने त्याचवेळी धास्तावलेल्या विरोधकांनी डाव साधला व त्या परिसरातील संपूर्ण लाईट बंद केली.
परंतु असल्या कुटील कारस्थानांना बळी न पडणारा भाजपाचा कार्यकर्ता आपापल्या मोबाईलचा टॉर्च सुरू करून अमोल भाऊंचा एक सच्चा निष्ठावंत कार्यकर्त्याच्या व भावी आमदार अमोल भाऊ यांच्या पाठीशी आपण आहोत हे या व्हिडिओतून कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख मा. ज्ञानेश्वर जळकेकर जी महाराज यांना दाखवून दिले व अमोल भाऊंना भाजपाचे तिकीट सुटावे अन्यथा पाचोरा-भडगाव विधानसभा मध्ये मैत्रीपूर्ण लढत लढण्याची परवानगी द्यावी असे आवाहन केले.