पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत
पतीने मिरची पावडर गुप्तांगात टाकुन केली हत्या चाळीसगाव तालुक्यातील घटना पोलिसात गुन्हा दाखल.
चाळीसगाव-
पतीने आपल्या पत्नीच्या चरित्रावर संशयाच्या कारणाने खून केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे दिगर येथे घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पतीला मेहुणबारे पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा दिगर शिवारात रहिवासास कामानिमित्ताने असलेल्या राजेश जगन पावरा (बारेला२८) हा आपल्या पत्नीसोबत शेत गट क्रमांक ४५८ मध्ये वास्तव्यास आहे. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते २६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेच्या दरम्यान राजेश पावरा याने पत्नी शिवानी हिच्या चरित्रावर संशय घेत हातात मिरचीची पावडर घेऊन गुप्तांगात टाकून तिचा निर्घृन हत्या केली. हा प्रकार सकाळी उघडकीस झाल्याने परिसरात खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच मेहूणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ पंचनामा केला. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. पोलिसांनी संशयित आरोपी राजेश जगन पावरा यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रामेश्वर रूपचंद राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेश जगन पावरा बारेला याच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहे.