राज्य

शिर्डी विमानतळ जप्तीचे काकडी ग्रामपंचायतीने काढले वॉरंट; 8 कोटी 30 लाख रुपये कराची रक्कम थकीत,

Pachora|बांग्लादेशात उरण मध्ये घडलेल्या घटनेचा विश्वहिंदू परिषद बजरंगदलाच्या वतीने तीव्र निषेध


कोपरगाव-

कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळाकडे ग्रामपंचायतीची 8 कोटी 30 लाख रुपये कराची रक्कम थकीत आहेत. कराची ही थकीत रक्कम ग्रामपंचायत कार्यालयास जमा होत नसल्याने गावाच्या सर्वांगीण विकासावर व दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही ती रक्कम मिळत नसल्याने ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सरपंच पूर्वा गुंजाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

ग्रामपंचायतीने महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरण कंपनी, मुंबई यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, कर बाकी भरण्याबाबत सातत्याने पत्रं देण्यात आली आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये अंतिम स्मरणपत्र देण्यात आले. 24 मार्च 2024 रोजी हुकूम नोटीस, 129 प्रमाणे दिलेली करवसुली नोटीस, राष्ट्रीय लोकअदालत नोटीस, ग्रामपंचायतीचा मासिक सभा ठराव देऊनही कर भरणा झालेला नाही. त्यामुळे आपल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे असलेली थकीत कराची वसुली करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 124 व कलम 129 अन्वये खालील नमूद मिळकतीप्रमाणे मागणी बिले, नोटीस, रिट हुकूम, लोकअदालत नोटीस बजावलेल्या आहेत.

शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंग, पेव्हर ब्लॅक एरिया, इंडियन ऑईल पंप, सबस्टेशन बिल्डिंग, पॉवर जेनरेटर बिल्डिंग, एटीसी टॉवर, रनवे, जीएसआर वॉटर टँक, वॉल कंपाउंड, पार्किंग रस्ता 1 आणि 2 अशा एकूण 23.50 एकर जागेची 2018 पासून कर भरणा थकीत आहे, असेही ग्रामपंचायतीने यात नमूद केले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!