जळगाव जिल्हा
बांगड्या व्यावसायिकाचा मुलगा एम.पी.एस.सी. परिक्षेत उत्तीर्ण…
भडगाव-
गुढे तालुका भडगाव येथील रहिवाशी चांद मन्यार यांनी बांगड्या विक्रीचा व्यवसाय करुन त्यांचा मुलगा शोएब चांद मन्यार यांनी अथक परिश्रम करत एम. पी. एस. सी. परिक्षेत यश संपादन केले आहे. शोएब मन्यार यांच्या या यशाबद्दल त्यांचा पाचोरा येथील अॅग्नो उर्दू शाळेत , शाळेमार्फत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अॅग्नो उर्दू स्कुलचे मुख्याध्यापक शोएब सर, रेहान सर,जावेद सर, अजहर सर, शरीफ सर, आकिब सर, वकार सर यांचेसह अॅग्नो उर्दू स्कुलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील शोएब मन्यार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सचिव इरफान शेख इकबाल मणियार उपस्थित होते.यावेळी शोएब मन्यार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.