शेतीच्या वादातून मोठ्या भावाने केला,छोट्या भावाचा खून; दोन तासातच केला भडगाव पोलिसांनी खुनाचा उलगडा.
भडगाव-
दिनांक १२ ऑगस्ट २०२४ सोमवार रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील पोलीस पाटील श्रीमती चेतना पाटील यांनी फोनव्दारे भडगाव पोलीस स्टेशनला कळविले की, पिचर्डे ता.भडगाव गावी विठ्ठल आनंदा पाटील वय ४१ हे त्यांचे खळ्यात झोपलेले असतांना त्यांचे डोक्यात कोणीतरी काहीतरी वार करुन खुन केलेला दिसत असल्याची माहिती भडगाव पोलीस स्टेशनला दिली, पोलिसांनी तात्काळ घटनेस्थळी धाव घेतली, मयत विठ्ठल आनंदा पाटील हे पिचर्डे गावातील त्यांचे खळ्यात खाटीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते. त्यांचे डोक्यावर धारधार शस्त्राने वार केलेले दिसत होते. सदर ठिकाणी धारधार शस्त्राने वार करणारा आरोपी मिळुन येईल असा कोणताही पुरावा पोलिसांना दिसुन येत नव्हता. तेव्हा गावातुन माहिती घेवुन माहिती काढली असता मयत विठ्ठल आनंदा पाटील व त्यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील यांच्यात शेतीच्या वाटनी वरुन वाद सुरु होता व काल दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी सायकांळी 5 वाजेच्या सुमारास मयत विठ्ठल आनंदा पाटील हे त्यांचे खळ्यात बकऱ्या बांधण्यासाठी तारजाळी बांधणार असल्याने त्यास मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील हा विरोध करत असल्याने त्यांच्यात खळ्यातच भांडण झाल्याचे समजुन आले. सदर भांडणाचा धागा पकडुन पोलिसांनी लागलीच मयत विठ्ठल आनंदा पाटील यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील याचा गावात व त्यांचे घरी शोध घेतला असता ते त्यांचे घरी मिळुन आलेत. तेव्हा त्यांचे घरात त्यांचे रक्ताचे भरलेले कपडे मिळुन आल्याने त्यांना लागलीच पोलीस स्टेशनला आणुन त्यास कसून विचारपुस करुन पोलीस खाक्या दाखविताच त्यांनी त्यांचा लहान भाऊ विठ्ठल आनंदा पाटील यांचे डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खुन केल्याची कबुली दिल्याने सदरचा गुन्हा हा २ तासाच्या आत उघडकीस आणला आहे. त्यावरुन मयत विठ्ठल आनंदा पाटील यांची पत्नी रेखाबाई विठ्ठल पाटील यांचे फिर्यादवरुन भडगाव पोलीस स्टेशनला गुरन २६०/२०२४ भारतीय न्याय सहिता २०२४ चे कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री माहेश्वर रेड्डी सो, जळगाव, मा.अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर सो, चाळीसगाव परिमंडळ, मा. सहायक पोलीस अधिक्षक श्री अभयसिंह देशमुख चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार पोलीस उपनिरीक्षक श्री शेखर डोमाळे, स.फी. अनिल अहिरे, पोहेकौं निलेश ब्राम्हणकार, पोहेकाँ मुकुंद परदेशी, पोकाँ प्रवीण परदेशी, पोकाँ महेंद्र चव्हाण, पोकाँ सुनिल राजपुत, पोकों संदिप सोनवणे, पोकाँ जितेंद्र राजपुत, संभाजी पाटील (चालक), होमगार्ड प्रदिप सुभाष पाटील यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहेत.