पाचोरा शहरांतील खड्डे व निकृष्ट पद्धतीने झालेल्या विकास कामांवर भाजपा युवा मोर्चाचा सोशल वार;नागरिकांनो समस्यांचे फोटो पाठवा आम्ही वाचा फोडू अशा पद्धतीने केले आवाहन..!
पाचोरा-
पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीचे वातावरण जोरदार तापायला सुरुवात झाली आहे. यामध्ये स्थानिक आमदार विकास कामांचा बिगुल वाजवत जनते समोर जात आहे.कोट्यावधीचा विकास झाला परंतु कोणाचा हा जनतेला प्रश्न आहे. कारण मुलभुत सुविधां पासुन जनता आजही वंचित आहे. यापैकी पाचोरा शहरातील संघवी कॉलनी, मानसिंग कॉलनी, विवेकानंद नगर,रिंग रोड,गिरणा पंपिंग रोड,जिजामाता कॉलनी,गाडगेबाबा नगर,भास्कर नगर, तलाठी कॉलनी, गणेश कॉलनी थेपडे नगर,आशीर्वाद ड्रीमसिटी व इतर भागातील त्रस्त जनतेच्या मुलभूत सुविधांवर आधारित पोस्ट व्दारे सोशल वार भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे. यामध्ये
#विकासाच्या नावाने करू नका खोट्या गप्पा…
#निकृष्ट कामे करून पूर्ण केलाय तुम्ही कमिशनचा टप्पा…
#त्यामुळेच लागलाय तुम्हाला गद्दारीचा ठप्पा…
अशा पद्धतीने विविध भागातील निकृष्ट कामांची फोटो तसेच जनतेच्या समस्यांची फोटो असलेल्या पोस्ट सोशल मीडियावर फिरवून भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांची व झालेल्या निकृष्ट विकास कामांची पोलखोल केली जात आहे.अशाच प्रकारच्या आपल्या गावातील व परिसरातील मुलभूत सुविधा पासुन जनता वंचीत असेल जी कोटयावधीची कामे निकृष्ठ दर्जाची झाली असतील सोबतच बॅनरवर अथवा कागदोपत्री जे काम झालेले दिसत असेल मुळात अस्तित्वात नसेलच अशा सर्व बाबतीत पुराव्या व फोटो सह भारतीय जनता पार्टी कार्यालय कृ.उ.बा. समीती समोर पाचोरा येथे सादर करावीत असे नम्र आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पाचोरा शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.