स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैशालीताई सुर्यवंशी यांचा मदतीचा हात..
पाचोरा-
दिनांक १४ ऑगस्ट २०२४ बुधवार रोजी तालुक्यातील हडसन येथील सरस्वती अभ्यासिकेत स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या तरूणांना शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने पुस्तकांचा सेट भेट म्हणून देण्यात आला.
हडसन येथील सरस्वती अभ्यासिकेत गावातील तरूण हे एमपीएससी आणि युपीएससीची तयारी करतात. या तरूणांना वैशालीताई सुर्यवंशी यांनी अत्यंत उपयुक्त अशा ३० पुस्तकांचा सेट भेट म्हणून दिला. या तरूणांनी अभ्यास करून गावासह मतदारसंघाचा लौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह उध्दव मराठे, देविदास दामू पाटील, अण्णा फकीरा पाटील, सुरेश चिंतामण पाटील, रमेश गजमल पाटील, राजेंद्र कृष्णराव पाटील, देविदास नारायण पाटील, बापू आधार पाटील, दिलीप रामदास पाटील, गणेश चिंतामण पाटील, युवराज शंकर पाटील, प्रवीण नंदलाल पाटील, सागर देविदास पाटील, विनोद रमेश पाटील, सागर दिवानसिंग पाटील, आदित्य पाटील, शरद अर्जुन पाटील, अल्पेश पाटील, अतुल दिलीप पाटील व रोहित भावलाल पाटील आदी मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.