जळगाव जिल्हा
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून युवा सामर्थ्य फाऊंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप…

पाचोरा-
युवा सामर्थ्य फाऊंडेशन चे सदस्य पाचोरा शहरात विविध प्रकारे कौतुकास्पद कार्य फाऊंडेशन चा वतीने करत असतात.सालाबादप्रमाणे आज ७८ व्या स्वतंत्र दिवसाचे औचित्य साधून युवा सामर्थ्य फाउंडेशन पाचोरा यांनी जिल्हा परिषद मराठी (कृष्णराव सोसायटी) शाळेमधील विद्यार्थी,विद्यार्थीनी शालेय उपयोगी साहित्याचे,व बिस्किटांचे आणि फरसाणाचे पाकीटे वाटप करण्यात आले.

युवा सामर्थ्य फाउंडेशन नेहमी सामाजिक कामात अग्रेसर राहते त्यांनी या अगोदर मोफत वाचनालय, मोफत ई-सेवा केंद्राची सुरुवात केली आहे .
या कार्यक्रमा प्रसंगी ,युवा सामर्थ्य फाउंडेशन चे अध्यक्ष -उमेश (बंटी) हटकर शैलेश बागुल, अँड,राजेश वासवानी, आकाश केसवाणी,अभिषेक गाय संमिंदर, अतिश हटकर, यश मोरे ,पंकज ब्राह्मणे ,प्रवीण हटकर , अजय हटकर यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.




