मोठ्या उत्साहात पार पडला सामूहिक रक्षाबंधन सोहळा
जनतेच्या प्रेमाने भारावले; वैशालीताई सुर्यवंशी
पाचोरा-
रक्षाबंधन सणा निमित्ताने आयोजीत सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाला मतदारसंघातून मिळालेला प्रतिसाद पाहून मी जनतेच्या प्रेमाने भारावले असून हे ऋण आयुष्यात फेडता येणार नसल्याचे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या पार पडलेल्या सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमात बोलत होत्या.
वैशालीताई सुर्यवंशी यांना पाचोरा-भडगाव मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळत असून सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमात याची प्रचिती आली. श्रावणी सोमवार निमित्त वैशालीताईंनी पहाटे महादेवाचे दर्शन घेतले. यानंतर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी दहा वाजेपासून सामूहिक रक्षाबंधन सुरू झाले. यात मतदारसंघातील आबालवृध्द भावंडांनी आवर्जून उपस्थिती देत, वैशालीताई आणि त्यांच्या सहकारी भगिनींकडून राख्या बांधून घेतल्या.
वैशालीताई सुर्यवंशी यांच्या संघर्षात आम्ही भाऊ म्हणून त्यांच्या सोबत आहोत, अशी भावना मतदारसंघातील अनेकांनी बोलून दाखविली. तर बऱ्याच भावांनी ताईंसाठी वेगवेगळ्या भेटी देखील आणल्या. या कार्यक्रमात ताईंनी आपले सर्व सहकारी पदाधिकारी व कार्यकर्ते बांधव यांना देखील राखी बांधून स्नेहाचा धागा घट्ट करत सोबत संघर्ष करण्याचा संकल्प केला. कार्यालयातील रक्षाबंधन आटोपल्यानंतर वैशालीताई सुर्यवंशी यांनी पाचोरा पोलीस स्थानकात जाऊन जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या कार्याला सलाम केला.
या सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाला दिपकसिंग राजपूत, अरूण पाटील, शरद पाटील, अनिल सावंत, हरी पाटील, अभिषेक खंडेलवाल, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, विकास वाघ, संजय चौधरी, दादाभाऊ चौधरी, गफ्फारभाई, राजेंद्र राणा, पप्पू जाधव, संदीप जैन, शशिकांत बोरसे, बंडू मोरे, गौरव पाटील, फकीरचंद पाटील, प्रितेश जैन, खंडू सोनवणे, मुकेश राजपूत, चंद्रकांत पाटील, हरीश देवरे, मनोज चौधरी, नितीन खेडकर, विजय हटकर, संदीप पाटील, प्रवीण वाघ, प्रशांत सोनार, आवेश पाटील, गजानन सावंत, नितीन लोहार, बंटी हटकर, राहूल संघवी, बालूअण्णा, जयसिंग कारभारी, संतोष पाटील, विसपुते अण्णा, रवींद्र पोपट पाटील, अरूण तांबे, ज्ञानेश्वर बडगुजर, अनिता पाटील, जयश्री येवले, कुंदन पांड्या, लक्ष्मी पाटील आदींसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.