जळगाव जिल्हा
जिन्यावरून पडल्याने युवकाचा मृत्यू; सर्वत्र हळहळ.
पाचोरा-
दि.०१/०९/२०२४
पाचोरा शहरातील श्रीकृष्ण सोसायटी भागातील रहिवासी तथा भाजीपाला विक्रेते आनंदा सुरेश कदम वय 39 यांचे दिनांक 21 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास राहत्या घरातील लोखंडी जिन्यावरून पाय घसरून पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने दुःखद निधन झाले. त्यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात आई-वडील भाऊ-बहीण असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने सर्वत्र व्यक्त केली जात आहे सदर घटनेची पाचोरा पोलिसात नोंद झाली असून घटनेचा तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.