जळगाव जिल्हा

स्वच्छता पाळा डेंग्यु टाळा
डेंग्यु तापापासुन सावधान ग्रामीण रूग्णालयाचा वतीने जनजागृती.

पाचोरा –


सध्या शहरात व ग्रामीण भागात डेंग्यूचे संशयीत रुग्ण आढळून येत आहेत या अनुषंगाने पाचोरा ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

डेंग्यु कश्या मुळे होतो त्याचे लक्षणे कसे ओळखाल या बाबत ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी यावेळी सांगितली.
डेंग्यु ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५ ते ६दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतो डेंग्यु ताप आणि रक्तस्त्रावात्मक ताप (डिएचएफ) डेंग्यु रक्तस्त्रावात्मक ताप हा अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो.

डेंग्यु तापचा प्रसार कसा होतो?
आजारी माणसाच्या रक्तातील विषाणू एडीस इजिप्ती जातीच्या डासांच्या मादीमार्फत चाव्याद्वारे दुसऱ्याच्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. एडीस इजिप्ती हा एक लहान काळा डास असून त्याच्यापायांवर पांढरे पट्टे असतात. आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिमि असतो. हा आपल्या शरीरात विषाणु तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो. आणि नंतर रोगाचा प्रसार करतो.

डेंग्यु तापची लक्षणे.
एकदम जोरात ताप चढणे. २) डोक्याच्या पुढचा भाग अतिशय दुखणे. ३) डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांना हालचाली सोबत अधिक जाणवते. ४) स्नायु आणि सांध्यांमध्ये वेदना होणे. ५) चव आणि भुक नष्ट होणे.

डेंग्यु रक्तस्रावात्मक तापची लक्षणे.

१) डेंग्यु तापाप्रमाणेच लक्षणे. २) तीव्र सतत पोट दुखी. ३) त्वचा फिकट, दंड किंवा चिकट होणे. ४) नाक, तोंड हिरड्यातुन रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे. ५) रक्तसह किंवा रक्तविणा वारंवार उलट्या होणे. ६) जास्त झोप येणे आणि अस्वस्थता वाटणे.
(७) रुग्णाला तहान लागणे आणि तोंड कोरडे पडणे. ८) श्वास घेण्यास त्रास होणे.

डेंग्यु तापची लक्षणे आढळल्यास काय कराल ?

ताप कमी करण्यासाठी पॅरासिटॉमल गोळ्या घ्याव्यात. ताप असे पर्यंत आराम करावा. तापासाठी किंवा वेदनात्मक अस्पिरिन किंवा आयबुप्रोफेन गोळ्या घेवू नये म्हणून जलपेयाचा भरपुर उपयोग करावा. (उदा. क्षार संजिवनी) रक्तस्त्राव व शॉकची लक्षण आढळल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे. घराचा परिसर स्वच्छ ठेवणे,

डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण हे करायला हवं.

घरातील पाण्याचे साठे (हौद, सिमेंटच्या टाक्या, कुलर, शेभवंत फुलदाण्या इत्यादी) आठ दिवसातून एक वेळा रिकाने करुन घासुन पुसून सुकऊन स्वच्छ करून नंतर पाण्याने भरणे. आठवडयाचा एक दिवस कोरडा पाळणे. झोपतांना किटकनाशक मारीत मच्छरदाणीचा वापर करणे. घराच्या परिसरात किंवा गच्चीवर / धाब्यावर रिकामे पडलेली पत्र्यांची डबे, नारळाच्या करवंटया, टायर, फुटकु, रांजण माठ यांची आरोग्यदायी विल्हेवाट लावणे, घरांच्या खिडक्या व दरवाज्यांना बारीक जाळी बसवावी.
घराच्या / गावाच्या परिसरात डासोत्पती स्थाने असल्यास त्यामध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावीत. (गप्पी मासे पाळा हिवताप व डेंग्यूताप टाळा)
घरातील गळत असलेले नळ, टाकी सर्व ताबडतोब दुरुस्त करुन पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. साचलेल्या डबक्यात वेस्टेज ऑईलची फवारणी करा संडासाच्या व्हेंट पाईपला जाळी बसवा.
स्वच्छता पाळा, डेंग्यु टाळा
या बाबतची जनजागृती ग्रामीण रूग्णालयाचा वतीने करण्यात येत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!