नवीमुंबई येथे इंडियन आयकॉनिक सन्मान महासोहळा संपन्न..
मुंबई-
अमरदीप बालविकास फाऊंडेशन आणि महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या वतीने “इंडियन आयकॉन सन्मान महासोहळा” साहित्य मंदीर, वाशी नवीमुंबई येथे मोठ्या उत्साहात थाटामाटात संपन्न झाला.
यासंगी विविध क्षेत्रात, “उल्लेखनीय व अनमोल कार्य” करणाऱ्या सेवाव्रतींना “राष्ट्रीय ह्युमन वेल्फेअर आयकॉनिक पुरस्कार व राज्यस्तरीय अमरदीप कर्तृत्व गौरव पुरस्कार” दिग्गज अतिथींच्या हस्ते प्रदान करुन, त्यांचा यथोचित ‘गौरव’ करण्यात आला.सदरहू महासोहळ्याची संकल्पना एन.डी.खान यांची होती. तर संयोजिका सौ.सलमा खान होत्या.यावेळी पनामा राष्ट्राचे वाणिज्य दूत श्री.जिजस कंपोस, से.नि. विभागीय उपायुक्त , नाशिक श्रीम.संगीता धायगुडे, कर्करोग शास्त्रज्ञ डॉ.अमजदखान पठाण, वकील व समाजसेवक, ॲड.रमेश खेमू राठोड, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी शिक्षण अधिकारी डॉ.जिवबा केळूसकर हे प्रमुख अतिथी म्हणून तर सिने अभिनेता व हास्य कलाकार तथा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम श्री.नितीन देसाई,सिने अभिनेत्री उर्मिला डांगे, उद्योजक अब्दुल कय्युम,सिने अभिनेता तथा दिग्दर्शक प्रसाद भागवत, आणि जागतिक विक्रम वीर गिर्यारोहक कु.अन्वी घाटगे हे सन्मा अतिथी म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी व अतिथी यांचा त्यांच्या कार्य क्षेत्रातील ‘अनमोल कामगिरी’ बद्दल संस्थे तर्फे ‘सन्मान’ करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक एन.डी.खान यांनी केले. तर कार्यक्रमाचे निवेदन लेखिका व साहित्यिक सौ.गीतांजली वाणी यांनी उत्तमरीत्या केले.यावेळी प्रदर्शित होणाऱ्या “कर्मवीर आबासाहेब” या बायोपीक चे प्रमोशन अल्ताफ दादासाहेब शेख व त्यांच्या टीमने उत्कृष्टपणे केले. सर्व कलाकाराना संस्थेच्या वतीने “सन्मानित” करण्यात आले.
यावेळी तारक मेहता का उल्टा चष्मा फेम, हास्य कलाकार , अभिनेता नितीन देसाई यांची हास्य मेजवानी, गजानन नरवाडे यांनी नाकाने वाजवलेली बासरी, गीतकार विलास देवळेकर लिखित व एकनाथ धयाळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘स्वागतगीत’ आणि, अभिनेत्री रंजिता पाटील व अभिनेत्री उर्मिला डांगे यांच्या ‘कोळी गीताच्या’ नृत्याने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.सदरहू महासोहळ्याचे अप्रतिम “आयोजन व नियोजन” केल्याबद्दल, फिल्म सेन्सॉर बोर्ड चे माजी सदस्य विलास खानोलकर व पायलट अमर खानोलकर यांनी महासोहळ्याचे संयोजक एन.डी.खान व सौ.सलमा खान यांचा यथोचित “सत्कार” केला. याप्रसंगी कर्करोग शास्त्रज्ञ डॉ.अमजद खान पठाण लिखित व इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन प्रकाशित ” असदबाबांचा स्तमित करणारा जीवन प्रवास” या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे संगीता धायगुडे यांच्या शुभहस्ते झाले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.स्नेहा चांदोरकर, डॉ.श्रेयश्री गोंडाबे, डॉ . शैलेंद्र पवार,विजय भोसले, विलास देवळेकर, सय्यद मुश्ताक हाश्मी, ईसा शेख, दीपक कदम, मारुती गायकवाड व प्रतिभा कीर्तीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
इंडियन आयकॉन सन्मान महासोहळ्याच्या ‘अद्याक्षराने’ शब्दश्री विलास देवळेकर यांच्या लेखणीतून उतरलेली “काव्य रचनेचा फ्लॅक्स” सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. आणि त्या सोबत बऱ्याच जणांनी ‘फोटोही’ काढले आहेत. तसेच ह्या कार्यक्रमाचे ‘आयोजन व नियोजन’ उत्तम झाल्या बद्दल, उपस्थितांनी संस्थेचे कौतुक केले.