डॉ.निळकंठ पाटील आयोजित शेतकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉ.पाटील यांची तालुक्यात वाढती लोकप्रियता.
पाचोरा-
दिनांक: 04/10/2024 शुक्रवार रोजी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथे डॉ.निळकंठ पाटील यांच्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.श्री. शामकांत पाटील (आदर्श शेतकरी ) आंबे वडगाव प्रमुख वक्ते: श्री. सहकार महर्षी श्री. उत्तम दादा थोरात रा.स्व. संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, यांनी आजच्या शेतकऱ्यांने शेतीसाठी 4M समजून घेण्याची आहे प्रकर्षाने लक्षात आणुन दिले, (4 M फोर एम ), 1M) मनी पावर ( आर्थिक व्यस्थापन ) M2) मँन पावर (मनुष्य बळ M3) मँनेजमेट (व्यवस्थापन M4)मार्केट (बाजारपेठ) इ. विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.शेतकरी आत्मनिर्भर व स्वावलंबी कसा बनेल तसेच स्वातंत्र्य नंतर राज्य करत्यांनी शेतकऱ्यांना चुकीच्या सवयी लावल्या व चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जात गेला.या मधुन बाहेर निघण्यासाठी नैसर्गिक शेती, सेंद्रियशेती ,विषमुक्त शेती गौ आधारित शेती केली तर खर्चात बचत होवुन उत्पन्नात वाढ होईल यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
डॉ. निळकंठ पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता वेळी म्हणाले की नदी खोलीकरण, त्यांनतर मका पिका पासून मका पासून स्टार्च निर्मिती करणे, (स्टार्च ) फॅक्टरी तसेच इथेनॉल प्रोजेक्ट उभा करणे. केळीवर, मोसंबी, लिंबू यावर आधारित प्रक्रिया उद्योग शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून उत्पादन वाढविणे. इ. आमच्या भागातील शेतकरी साठी मला वयक्तिक स्वार्थासाठी कंपन्या उभ्या करायची नसून प्रत्यक्ष, 25 शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या करण्याचा मानस व्यक्त केला. मी हॉस्पिटल, डॉक्टरकी सांभाळुन शेती करतो म्हणून मला शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या बऱ्यापैकी माहिती आहे,त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहिल.आगामी काळात मी भडगाव पाचोरा विधानसभा हि शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणार आहे आणी पुढील आमदार हा भुमिपुत्र असेल कोणत्याही परिस्थितीत आपल्याला लढायचं आहे व जिकांयच आहे. व मला आपला आशीर्वाद द्यावेत,असा निर्धार या वेळी डॉ.पाटील यांनी व्यक्त केला.
या वेळी पिंपळगाव हरे. गावाला लागुन असलेले पंचक्रोशीतील 26 गावाच्या शेतकरी बंधूचा सत्कार डॉ. श्री. निळकंठ पाटील व. डॉ. श्री विजय पाटील यांनी केला.श्री. सतिष श्रीराम बारी नगरसेवक भाजपा शेंदुर्णी. श्री. रवींद्र महाजन सर आंबे वडगाव , श्री. ईश्वर भिकन पाटील वाडी. श्री. प्रकाश विठ्ठल चव्हाण सर पिंपळगाव हरे. श्री. गजानन माळी कोल्हे श्री. गजानन संभाजी पाटील अटलगव्हाण श्री. प्रमोद चव्हाण कोकडी तांडा – गावकुश शेतकरी उत्पादक कंपनी, पाचोरा संचालक श्री. दिलीप राठोड वारसाडे श्री. साइदास चव्हाण वरसाडे तांडा श्री. संदीप पाटील महाराज कडे वडगाव श्री. श्याम पवार बडगुजर मंगल कार्यालय व्यवस्थापाक श्री. संभाजी रामकृष्ण पाटील श्री. सुरेश पाटील (राजुरी ) श्री.सतिष अण्णा पाटील शिंदाड भाजपा श्री. प्रमोद पाटील भोजे भाजपा श्री. बलदेव भुरा परदेशीं श्री. हरी अमृत चौधरी शिंदाड श्री. परशुराम हरी पाटील शिंदाड श्री. दगडू महादू शिंदे श्री. संजय युवराज पाटील वानेगाव श्री. भागवत गणपत पाटील – वानेगाव श्री. अमोल शिंदे अटलगव्हाण श्री. नामदेव पांडुरंग पाटील वानेगाव श्री.रामजी गंगाराम बारी लासूरे श्री. रामेश्वर देवराम देवरे लासूरे श्री. भरत नागो पाटील पिंपळगाव हरे. श्री. तुळशीराम माळी लोहटार भाजपा जेष्ठ कार्यकर्ते श्री. दिनेश पाटील खडकदेवळा श्री. ज्ञानेश्वर चांदणे निंभोरी श्री. पदमसिंग किसन परदेशीं डांभूर्णी श्री. राजेंद्र नामदेव पिंपळे श्री. शकील किरण पिंजारी अंतुर्ली, श्री. तुकडूदास चव्हाण वरसाडे श्री. रवींद्र महाजन श्री. रवींद्र महाजन आंबे वडगाव श्री. श्रीकांत कैलास पांडे शेवाळे, श्री. वसंत शामराव गवळी शेवाळे श्री. शिवाजी रमेश पाटील शेवाळे श्री. अण्णा हजारें शेवाळे श्री. वाल्मिक बळीराम कोळी श्री. पुंडलिक सोनवणे श्री. समीर शिंदे कोल्हे श्री. नाना बडगुजर पिंपळगाव हरे. किसान संघ जिल्हा अध्यक्ष श्री. भैया दांडगे फत्तेपूर श्री. भागवत गणपत पाटील वानेगाव श्री. मगनदास दामू पाटील श्री. संजय युवराज पाटील श्री. नामदेव पांडुरंग पाटील श्री. दिलीप भास्कर पाटील श्री. धनराज दिलीपचंद पाटील श्री. कैलास मोहन पाटील श्री. संजय भास्कर पाटील पिंप्री श्री. प्रकाश माणिक खासेराव श्री. शालिग्राम भिकन देवरे निंभोरी श्री. पांडुरंग सुखदेव राऊतरॉय श्री.पांडुरंग केशव पाटील श्री. समीर तडवी माजी पंचायत समिती फतेपूर श्री. शरद जाधव मादणी श्री. गोकुळ म्हस्के श्री. गुलाब नत्थू पाटील श्री. संभाजी जगन्नाथ पाटील श्री. संभाजी पाटील वाक श्री. विरभान दादा पाटील आंबे वडगाव श्री. कबीर भाऊ तडवी फत्तेपूर श्री. अतुल पाटील कडे वडगाव श्री. गोपाल पाटील कडे वडगाव श्री. ईश्वर पाटील कडे वडगाव,सर्वांना भगवान बळीराम यांची प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरजी शिनकर यांनी केले.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी डॉ निळकंठ पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
डॉ.निळकंठ पाटील यांनी पाचोरा भडगाव तालुक्यातील प्रत्येक गटामध्ये शेतकरी मेळावे घेतले असुन त्या शेतकरी मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.या वरुन असे दिसुन येते कि, डॉ निळकंठ पाटील यांची जनमानसात वाढती लोकप्रियता दिसून येत आहे.