येत्या १५ दिवसात शिवसेना शिंदे गटाची नवीन कार्यकारिणी होणार जाहीर..

पाचोरा-
शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे माजी कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, तथा विद्यमान उपमुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व शिवसेना सचिव श्री.संजयजी मोरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार मा.श्री रावसाहेब मनोहर गिरधर पाटील (शिवसेना जिल्हाप्रमुख,जळगाव) यांच्या आदेशाने (पाचोरा, भडगाव व चाळीसगाव) या तीनही तालुक्यातील शिवसेनेची शहर व ग्रामीण कार्यकारणीचा सन 2022 ते 2025 या तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याकारणाने पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कार्यकारणी मध्ये बदल करणे क्रमपात्र आहे,

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अभुतपूर्व यशामध्ये मागील कार्यकारणीचे योगदान अतुलनीय आहे. त्याबद्दल सर्वाचे मनपूर्वक आभार. तसेच जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांची पुढील कार्यकारणी सन 2025 ते 2028 या कार्यकाळा करिता येणाऱ्या १५ दिवसाच्या आत नव्याने घोषित करण्यात येईल, याची सर्व पाचोरा,भडगाव,चाळीसगाव या तीनही तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी नोंद घ्यावी.




