जळगाव जिल्हा

पिंपळगाव हरेश्वर येथे शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद..

पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या ठिकाणी शेतकरी व कार्यकर्ता  मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला या मेळाव्याला संपूर्ण परिसरातील नागरिक व  महिला वर्गानी प्रचंड गर्दी केली याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून मेळाव्याला सुरुवात झाली या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी  सुभाष यादवराव गरुड (माजी पोलीस पाटील पिंपळगाव हरेश्वर) हे होते.

यावेळी व्यासपीठावर पाचोरा भडगाव विधानसभेचे इच्छुक उमेदवार नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, डॉ.पूनमताई प्रशांत पाटील ,जगदीश अशोक पाटील, शामकांत भोसले ,पंकज पाटील उपसरपंच चिंचपूरे, प्रकाश पाटील  वाणेगाव, बाळद येथील उपसरपंच सचिन भैय्यासाहेब पाटील, यशवंत पाटील (पोलीस पाटील राजुरी), अरुण वामन पाटील, राजेंद्र पाटील भडगाव, राजेंद्र महाजन, प्रकाश महाजन, बी आर महाजन यासह पिंपळगाव कुऱ्हाड शिंदाड परिसरातील परिसरातील कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन सदस्य आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मेळाव्याला संबोधित करताना सर्वप्रथम परमपूज्य गोविंद महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत सुरुवातीला बी आर महाजन यांनी शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याविषयी आपले विचार मांडून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी खऱ्या अर्थाने जपणारा माणूस म्हणजे प्रतापराव हरी पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचे आवाहन सर्व उपस्थित लोकांना  केले.

यावेळी प्रकाश चव्हाण यांनी अटलगव्हाण धरणाचे पाणी पिंपरी येथे आणण्यासाठी नानासाहेबांनी प्रयत्न करावे व शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कटिबद्ध राहुन पिंपळगाव गावात शिक्षणाची गंगोत्री आणण्याचे आवाहन त्यांनी केले यानंतर राजू पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने लढा देणारा माणूस शेतकरी पुत्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा मातीची मातीची नाळ जपणारा माणूस आपल्याला तुमच्या सर्वांच्या सहकार्याने विधानसभेत पाठवायचा आहे असे सांगितले शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी नानासाहेबांच्या वतीने मी आपल्याला शब्द देतो यावेळी राजेंद्र महाजन यांनी नानासाहेबांच्या हाकेला दाद द्या ते नक्कीच निवडून आल्यानंतर तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्दल राहतील असे सांगितले त्याचप्रमाणे मोडकळीस आलेले सहकार क्षेत्र पुन्हा नव्याने उभारण्यासाठी नानासाहेबांना निवडून देणे अत्यंत गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

यानंतर शिवाजी आत्माराम पाटील यांनी आपले विचार मांडले यावेळी दूध संघाच्या संचालिका डॉ पुनम ताई पाटील यांनी आपल्या मनोगतातून नानासाहेबांसारख्या एका साध्या व्यक्तिमत्त्वाला विधानसभेमध्ये पाठवण्याची संधी आपण एकदा द्यावी त्या संधीचे नक्कीच ते सोनं केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली स्त्री शिक्षणाचा प्रश्न आमच्या माध्यमातून नक्कीच सोडवला जाईल नानासाहेब त्यांच्या माध्यमातून आपण महिलांना, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ, शौचालयाचा प्रश्न सोडवू, त्याचप्रमाणे बसेसची सुविधा उपलब्ध करून देऊ त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन नानासाहेब  यांच्या मागे खंबीरपणे उभे रहा असे आवाहन केले यानंतर या मतदारसंघात उमेदवारी करू इच्छिणारे नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मी ग्रामीण भागाचा कार्यकर्ता असून ग्रामीण भागातील प्रश्नांची मला चांगल्या प्रकारे जाण आहे मी शेतकरी पुत्र असून शेतकऱ्यांच्या व्यथा विधानसभेमध्ये मांडून त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल व या गावांमध्ये मुलींसाठी विद्यालय स्थापन करण्याचा माणस देखील त्यांनी बोलून दाखवला या मेळाव्याला परिसरातील असंख्य नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भोसले यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्थानिक परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केलं.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!