भर निवडणुकीच्या प्रचारातुन शेतकरीपुत्र अमोल शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर;नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर,पंचनामे करून तात्काळ मदत देण्याचे केले आवाहन
पाचोरा-
काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटंसह अतिवृष्टी सदृश्य पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे पाचोरा आणि भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.कपाशीच्या झाडाला लागलेल्या कापसामधूनच आता कोम फुटायला लागली आहेत. मका ज्वारी सोयाबीन इत्यादी पिकांची कापणी व खुडणी झाली असून अति पावसामुळे शेतात पाणी तुंबून शेतात पडलेल्या त्या कंसांना देखील आता कोम फुटून ते पूर्णपणे सडण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व संकटांमुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत.
प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणारे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वतःचा शेतकरी पुत्र वाटणारे अमोल शिंदे स्वतःच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असताना देखील शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य देऊन त्यांनी थेट शेतकऱ्यांचा बांध गाठला आणि परधाडे व परिसरातील झालेल्या नुकसानीची पूर्णपणे माहिती घेत पाहणी केली व संकटातून सावरण्यासाठी आणि लढण्यासाठी शेतकऱ्यांना हिम्मत देऊन तेथूनच थेट प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून लवकरात-लवकर दिवाळी आधी मदत मिळवून द्यावी असे आवाहन केले आहे.सगळीकडे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असून ३० दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्वच उमेदवार प्रचारासाठी मतदारसंघात फिरताना दिसत आहेत.अशा परिस्थितीत आमदार प्रचारात मस्त आणि शेतकरी संकटाने त्रस्त असल्याचे अमोल शिंदे यांनी आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे.तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करण्याचे सूचना दिल्याचे नाटक करण्यात आले. परंतु त्यावर अजून कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही.ओला दुष्काळ जाहीर होईल तेव्हा होईल पण आज तात्काळ पंचनामे होऊन पिक विमा कंपनीच्या माध्यमातून असो किंवा शासन स्तरावरून असो शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मदत मिळणे आवश्यक आहे.
अन्यथा शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात जाईल अशी परिस्थिती पाचोरा आणि भडगाव तालुक्यांत बघावयास मिळत आहे.असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.