जळगाव जिल्हा
श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा शाळेची विद्यार्थिनी ऋतुजा बाल पांडेची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड..
पाचोरा-
जळगाव ते नुकत्याच पार पडलेल्या नाशिक विभागीय शालेय १४ वर्षाखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत श्री. गो. से. हायस्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा बाल पांडे ६ पैकी ५.५ गुण संपादन करून २३ सप्टेंबर पासून नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. तिच्या या यशाबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हा. चेअरमन विलास जोशी स्कूल कमिटी चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. पाटील, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील पर्यवेक्षक ए. बी. अहिरे पर्यवेक्षिका अंजली गोहिल सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.