राजपूत समाजाच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण
जळगाव-
14 मे रोजी राजपूत महासंमेलना मध्ये देशाचे संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा राजपूत समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण ला जळगाव येथे राजपूत समाजाकडून सुरुवात केली यावेळी दिनांक 03/10/2023 रोजी सौ.वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा नोंदवला आणि राजपूत समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी यांना समाज बांधवांसोबत निवेदन दिले असून निवेदनात मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
1)राजपूत भामटा/परदेशी भामटा जातीस जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुरळीतपणे देण्यात यावे
2)वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी
3)वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती राज्यात 9 मे रोजीच जन्मतारखेनुसार साजरी करण्यात यावी व या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी.
4)समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय/निमशासकीय वस्तीगृहे स्थापन करण्यात यावीत.
5)राष्ट्रहितार्थ वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या महान कार्याचा प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा.
6)भारत सरकारने घुमंतू व अर्ध घुमंतू भटक्या/विमुक्त जनजातीच्या अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या ‘बाळकृष्ण रेनके व दादा विधाते आयोग’ यांनी सादर केलेल्या अहवालातील शिफारशी त्वरित लागू करण्यात याव्यात.
7) विमुक्तजाती/भटक्याजमाती व इतर मागास प्रवर्गांची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
8)राजपूत भामटा/परदेशी भामटा जाती समूह वास्तव्य करत असलेल्या वाडी वस्तींवर सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
9)भारत सरकारने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र माध्यमिक व उच्च माध्यमिक सैनिकी विद्यालय सुरू करण्यात यावे.
10)अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीप्रमाणे विमुक्त जाती/भटक्या जमाती व ओबीसी विद्यार्थ्यांच्या सर्व अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती देण्यात यावी.
11)राजपूत भामटा/परदेशी भामटा जातीतील महिला बचत गटांना उद्योगासाठी विशेष आर्थिक सहाय्य निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
12)परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना.तसेच संशोधकास शासनाकडून आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती देण्यात यावी.
13)सशस्त्र बलांमध्ये भरतीसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालू करावे.
15)समाजाच्या न्याय्य मागन्यांसाठी व जनहितार्थ केलेल्या आंदोलनात दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात
श्री सजन सिंग पवार, विनोद पवार व चंद्रशेखर राजपूत सह समस्त समाज बांधव यांच्या उपस्थित माननीय कलेक्टर महोदय यांना निवेदन देण्यात आलं .