नवनिर्वाचित आमदार किशोर आप्पा पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी भडगावावात प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी शिवसैनिकांचे साकडे घातले.
भडगाव-
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किशोर आप्पा पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी भडगावावात प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी शिवसैनिकांचे साकडे घातले.
भडगाव येथील बाजार चौकातील श्री राम मंदिरात आमदार किशोर आप्पा पाटील यांना जनतेने भरघोष मतांनी विजयी केले. सलग तिसऱ्या वेळेस जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या विकासाठी किशोर पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली. शिवसेना-युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भडगाव येथील बाजार चौकातील मंदिर प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी शिवसैनिकांनी मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी साकडे घातले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शहर प्रमुख बबलू देवरे, आबा चौधरी, अतुल परदेशी,जगन भोई,संतोष महाजन, दादा भोई, संभाजी पाटील, नाना हाडपे, प्रदीप महाजन, नितीन महाजन, दुर्गेश वाघ, निलेश चव्हाण नागेश वाग, आबा महाजन, मंदार कासार, रवी आहिरे, अमोल पाखले, राजू आहिरे, रवी सोनार, सुनील भोई महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रत्ना पाटील, शहर प्रमुख भारती माळी, सीमा महाजन, सुनंदा राजपूत, जया महाजन, राजश्री वाणी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
51 नारळ फोडून नवस फेडला
शिवसेनेचे महेंद्र ततार यांनी आमदार किशोर आप्पा पाटील हे सलग तिसऱ्या वेळी निवडून यावे म्हणून 51 नारळ वाढवण्याचा नवस केलेला होता. तो नवस आज पुर्ण करण्यात आला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रीराम मंदिरात नारळ फोडून नवस पुर्ण केला. तर किशोर आप्पा पाटील हे मंत्री व्हावेत व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यात आली.