आमडदे विद्यालयात १० वी १२वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व कॉपीमुक्त जन जागृती अभियान संपन्न.

भडगाव-
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे शाळेमध्ये २२ जानेवारी २०२५ रोजी १०वी व १२वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व कॉपी मुक्त अभियान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव हरी पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी चे माजी मानद सचिव तथा कै दीनानाथ दूध उत्पादक सोसायटी आमडदे येथील चेअरमन बाळासाहेब जगदीश अशोक पाटील, धर्मराज तुकाराम भोसले, राजेंद्र न्यावबा पाटील, नारायण किसन पाटील, किशोर रघुनाथ पाटील, रमेश रायला पाटील,डॉ तुकाराम नारायण भोसले, लीलाधर सूपडू पाटील, दीनानाथ हिरामण पाटील, सतिलाल पाटील, सुरेश प्रकाश बोरसे, प्राचार्य आर आर वळखंडे , प्राथमिक मुख्याध्यापक विलास पाटील , पर्यवेक्षक बी एन पाटील सर, माजी पर्यवेक्षक ए व्ही देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यानंतर विद्यालयातर्फे मान्यवरांचा १०वी व १२वी विद्यार्थ्यांतर्फे सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य आर आर वळखंडे यांनी केले त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकेतून विद्यार्थ्यांना अभ्यास का करायचा ? आणि तो अभ्यास कसा करायचा ? याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली यावेळी विद्यार्थी मनोगत इयत्ता १० वी वर्गातून सृष्टी पाटील, साक्षी पाटील, रोहिणी पाटील, समीक्षा भोसले, रितू पाटील, तेजस्विनी पाटील, धानी पाटील, गायत्री पाटील, ललिता पाटील, भावेश पाटील यांनी तर इयत्ता १२ वी सायन्स या वर्गातून वृषाली पाटील, उदय पाटील, नागेश साबळे इत्यादी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली याप्रसंगी यानंतर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी फिशपोंड कार्यक्रम संगीतमयरित्या घेतला तसेच त्यानंतर एकलव्य ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षा नागपूर तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल घोषित करून संबंधित विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांच्या शुभहस्ते गौरव पाटील, साई पाटील, उमंग पाटील ,अंजली पाटील, वेदांत पाटील, प्रियंका पाटील, मयूर पाटील, पवन चव्हाण आणि शुभांगी सोनवणे या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व ट्राफी तसेच पुस्तके देऊन गौरवण्यात आले या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक संजू सूर्यवंशी , दत्ता भोसले,एस पी पाटील , भूषण पाटील यांचाही नामोल्लेख याप्रसंगी करण्यात आला यानंतर शिक्षक मनोगतातून वाय एम देसले सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले तर विद्यालयातील पर्यवेक्षक बी एन पाटील सर यांनी कॉपीमुक्त अभियानाची जनजागृती सर्व मान्यवर व पालकांसमोर करून विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे महत्त्व पटवून दिले व मार्गदर्शक अशा सूचना याप्रसंगी सांगितल्या यानंतर या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थिनी धानी पाटील व गायत्री पाटील यांनी केले तर आभार पर्यवेक्षक बी एन पाटील यांनी मानले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.





