जळगाव जिल्हा

एम. एम. महाविद्यालयात ‘जागतिक महिला दिना’निमित्त ‘सायबर क्राईम’विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

पाचोरा-

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाचोरा येथील वाणिज्य आणि व्यवस्थापन व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभाग व ह्युमन डेव्हलपमेंट फाऊंडेशन, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक महिला दिना’निमित्त महिला व मुलींसाठी Cyber Crime याविषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन जळगाव येथील सायबर सेल विभागाच्या श्रीमती दीप्ती अनफाट यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संस्थेचे चेअरमन श्री. नानासाहेब संजय ओंकार वाघ व व्हा. चेअरमन श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष बी. पाटील यांनी Cyber Crime चे काही अनुभव सांगत महिला व मुलींची कशी फसवणूक केली जाते याचे कथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षण कार्यक्रम समन्वयक प्रा. जयश्रीताई वाघ यांनी केले. तर जळगाव येथील सायबर सेल विभागाचे श्री. अरविंद वानखेडे यांनी Cyber Crime याविषयी प्रत्यक्ष घडत असलेले उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्यांमध्ये कोणत्या गुन्ह्यांचा समावेश होतो व त्यासाठी कोणती शिक्षा दिली जाते याचेही ज्ञान महिला व मुलींना करून दिले. बँक ऑफ महाराष्ट्र पाचोरा शाखेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक श्री. पराग निखारे यांनी Financial Fraud विषयी मार्गदर्शन केले.
तर पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे यांनी Cyber Crime च्या सर्व गुन्ह्यावर धडे दिले व त्यापासून सुरक्षित राहण्यासाठीही मार्गदर्शन केले. श्री. गोकुळ सोनार यांनी ‘Cyber Security Professinal Basic Online Course’ याविषयी माहिती दिली.यावेळी उपप्रचार्य डॉ. वासुदेव एस. वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील विचारमंचावर उपस्थित होते. तर डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, प्रा. अतुल पाटील, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. सुनील पाटील, प्रा. किरण पाटील, प्रा. गौतम निकम, डॉ. सरोज अग्रवाल, प्रा. लक्ष्मी गलाणी, प्रा. अक्षय शेंडे, श्रीमती ज्योती जाधव, श्री. सुनील नवगिरे, श्री. जयेश कुमावत, श्री. बी. जे. पवार, श्री. घनश्याम करोसिया, श्री. सुरेंद्र तांबे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 70 विद्यार्थिनी व महिलांची नोंदणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम सहसमन्वयक डॉ. क्रांती सोनवणे तर आभार प्रा. संजिदा शेख यांनी केले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!