महिला शक्ति हेच मानवी सुसंस्कारित पिढी घडविणारे खरे विद्यापीठ;डॉ.अनिल देशमुख..

पाचोरा-
दिनांक 8 मार्च 2025 जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत आयोजित कर्तुत्वान महिला शक्तीचा सन्मान सोहळा पाचोरा येथे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांचे अध्यक्षतेखाली , महिला जिल्हा महिला प्रांत प्रतिनिधी सौ.निर्मला देशमुख यांचे शुभ हस्ते , तालुका अध्यक्ष संजय रतन पाटील ,तालुका संघटक ॲड निलेश सूर्यवंशी , तालुका सचिव व शिक्षण समिती प्रमुख श्री सुधाकर पाटील, तालुका कृषी व महसूल समिती प्रमुख सौ.अरुण उदावांद, तालुका आरोग्य समिती प्रमुख डॉ.दिनेश सोनार,जिल्हा वैद्यकीय समिती प्रमुख डॉ.मुकेश नैनाव, तालुका न्याय व विधी समिती प्रमुख ॲड.स्वप्नील पाटील, डॉ.अमित देशमुख,श्री देसले सर,श्री सोमवंशी सर यांचे उपस्थित नुकताच उत्साहात संपन्न झाला.

सन्मान सोहळ्यास ग्राहक तीर्थ नानासाहेब बिंदुमाधव जोशी व ग्राहक पंचायत चे दैवत श्री स्वामी विवेकानंद यांचे प्रतीमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
तालुका सचिव श्री.सुधाकर पाटील यांनी मासाहेब जिजाऊ , स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले आदी आदर्श उल्लेखित करीत प्रास्तविक केले . त्या नंतर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सौ.निर्मला देशमुख जिल्हा महिला प्रांत प्रतिनिधी यांचे हस्ते आदर्श शिक्षिका सौ. अरुणा उदावांद ,सर्व सामान्यांचे आरोग्य सेवेत अग्रेसर असलेल्या डॉ.प्रतिभा तेली ,डॉ.जयश्री सोनार, डॉ.अमृता झवर , अंजली टोटल हेल्थ च्या मा.न्याशनल हेड डॉ.अनघा देशमुख डिंबले पुणे , सर्वोत्कृष्ट कुतुंबिनी सौ.प्रतिभा पाटील,सौ.अनिता सूर्यवंशी,सौ.अनिता पाटील, फूड हैजिन एक्स्पर्ट सौ.निता देशमुख पुणे आदी कर्तुत्वान महिलांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देत गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख जिल्हा महिला प्रांत प्रतिनिधी,जिल्हा महिला संघटक व पाचोरा भडगांव तालुका इनर व्हील च्या पिलर लेडी सौ.निर्मला देशमुख यांचा समस्त उपस्थित कर्तुत्वान महिला यांचे हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला.या नंतर सन्मानार्थ मनोगतात डॉ.सौ.अमृता झवर , डॉ.जयश्री सोनार, व सौ.अरुण उदावांद यांनी स्त्री शक्तीचा सन्मान व आदर समाजाने एक दिवसीय न करता कायम आदर करावा अशी रास्त भावना व्यक्त करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत बद्दल सन्मान सोहळा आयोजन बद्दल मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त केलेत.

जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका पाचोऱ्याने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्वान महिलांचा स्तुत्य असा सन्मान सोहळा आयोजित केल्या बद्दल संपूर्ण कार्यकारिणी चे अभिनंदन करीत सर्व सन्मानित महिलांच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव करीत महिला शक्ति हीच सुसंस्कारित मानवी पिढी निर्माण करणारे खरे शक्तीपीठ असून मूल्य शिक्षण देणारे ज्ञानपीठ असल्याचे गौरवोद्गार करीत समस्थ स्त्री शक्तीचा जागर अध्यक्षीय भाषणात डॉ अनिल देशमुख यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष श्री संजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्री तालुका संघटक ॲड निलेश सूर्यवंशी यांनी केले.