सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा व माऊली हॉस्पिटल ॲन्ड क्रिटिकल केअर सेंटर भडगाव चा २१व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..

भडगाव-
सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा आणि डॉ गणेश सुपडु अहिरे यांच्या माऊली हॅास्पिटल ॲन्ड क्रिटिकल केअर सेंटर यांच्या तर्फे माऊली हॉस्पिटल, भडगाव चा २१ वा वर्धापन दिना निमीत्ताने 18 मार्च रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेले होते. या शिबिरात मोफत ह्रदयरोग, मधुमेह, मेंदुरोग, बालरोग, अस्थिरोग यांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात मोफत ईसीजी व रक्त तपासणी, मोफत औषधी वाटप करण्यात आले.

या शिबिराचा 376 रुग्णांनी लाभ घेतला या आरोग्य शिबीरात प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक मा.श्री पांडुरंग पवार होते. शिबिरात पाचोरा येथील कन्सल्टिंग फिजिशियन डॉ स्वप्निल पाटील, बालरोगतज्ज्ञ डॉ ग्रिष्मा पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ अंकुर झंवर, भडगाव येथील अस्थिरोगतज्ञ डॉ निलेश पाटील, डॉ शशांक कराळे व जनरल फिजिशियन ॲन्ड सर्जन डॉ गणेश अहिरे, डॉ ईश्वरसिंग परदेशी, बालरोगतज्ञ डॉ हेमंत पाटील, डॉ रूले, डॉ राजेन्द्र पाटील, डॉ विलास पाटील, डॉ ओस्तवाल व फार्मसीस्ट सौ स्वाती अहिरे व सौ संगीता अहिरे व लॅब टेक्निशियन यशवंत पाटील उपस्थित होते.

तरी या शिबिराचे यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी भडगाव व पाचोरा डॅाक्टर असोसिएशन, भडगाव मेडिकल व लॅब असोसिएशन ,एम आर असोसिएशन, भडगाव तालुक्यातील सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते व जय बाबाजी भक्त परिवार जळगाव जिल्हा या सर्वांनी सहकार्य केले.
