माऊली बहुद्देशीय जेष्ठ नागरिक संस्थेची बैठक संपन्न; विविध समस्या,अडीअडचणी बाबत करण्यात आली चर्चा..

पाचोरा-
पाचोरा येथील माऊली बहुद्देशीय जेष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने विरंगुळा केंद्रात संस्थेचे अध्यक्ष राजाराम सोनार यांच्या अध्यक्षतेत मासिक विचार विनिमय साठी आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक युवराज महाजन, प्रा. सी. एन.चौधरी, संतोष पाटील, कैलास महाजन, छगन पाटील, नाना महाजन, लक्ष्मण सूर्यवंशी, देविदास महाजन,जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या, अडीअडचणी भविष्यकाळातील ज्येष्ठांच्या वाढत्या वयानुसार येणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि आरोग्याच्या समस्या बाबत आणि विरंगुळा केंद्रात शासन, प्रशासन तसेच सामाजिक स्तरावर दानशूर व्यक्ती यांच्या मार्फत जेष्ठ नागरिकांना आवश्यक सोई सुविधा मिळविण्या बाबत देखील विचार विनिमय करण्यात आले.

विरंगुळा केंद्रात जेष्ठ नागरिकांच्या सभासद संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. वाढती सभासद संख्या पाहता जेष्ठ नागरिकांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून पाचोरा नगर परिषदेने ओपन स्पेस दिली आहे. मात्र या ठिकाणी जेष्ठ नागरिकांचे वया नुसार सुदृढ आरोग्य जोडण्यासाठी, हलके व्यायाम साहित्य, उन्हा पासून बचाव करण्यासाठी शेड ची रुंदी वाढविणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा,पंखे आदी साहित्यांची गरज असल्याची मते व्यक्त करण्यात आली.जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या विविध समस्या, उपाय, उपचार बाबत शेतातील नेत्रतज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी . एन.चौधरी आणि आभार मानले




