एरंडोल कासोदा मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

एरंडोल-
दिनांक 1ऑगस्ट 2025 शुक्रवार रोजी एरंडोल-कासोदा मार्गावर सकाळी एसटी बसला मोठा अपघात झाला. बस थेट खोल नाल्यात पलटल्याने झालेल्या या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून, 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.या बाबत सविस्तर वृत्त एरंडोल बस आगाराची बस (क्रमांक MH 20 BL 3402) ही भडगाव कडून एरंडोल कडे येत असताना एरंडोल पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर अंजनी धरणालगत असलेल्या पंधरा ते वीस फूट खोल असलेल्या चारीत जाऊन पडली. सदर बस ही खोल नाल्यात पडल्याने प्रवाशांना नागरीकांनी मागच्या व पुढच्या काचेतून तसेच खिडक्या मधुन बाहेर काढण्यात आले.

या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यात 15 प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, 35 प्रवाशी किरकोळ जमखी झालेत जखमींवर एरंडोल येथे प्राथमिक उपचार सुरू आहेत. जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग पूर्णपणे सक्रिय झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस दल, रुग्णवाहिका आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे एरंडोल-कासोदा मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.एसटी बसला क्रेनच्या साह्याने चारीतुन बाहेर काढण्यात आली.




