पाचोरा तालुक्यातील २३ वर्षीय तरुणी बेपत्ता, पोलीसात मिसिंग दाखल

पाचोरा-
तालुक्यातील एका गावातील 23 वर्षीय तरुणी ही बेपत्ता झाल्याची घटना घडली असून बेपत्ता तरुणीच्या वडीलाने दिलेल्या फिर्यादी वरून पाचोरा पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील एका गावातून
दि.08/08/2025 रोजी सकाळी 05.30 वाजेच्या सुमारास 23 वर्षीय तरुणी ही घरात कोणास काही एक न सांगता घरून निघुन गेली असुन तीचा घरच्या मंडळींने सर्वत्र शोध घेतला मात्र तरुणी आढळून आली नाही अखेर बेपत्ता तरुणीच्या वडीलाने पाचोरा पोलिसात फिर्याद दाखल केल्याने मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.बेपत्ता तरुणीचा विवाह एप्रिल 2025 मध्ये झाला होता परंतु काही कारणास्तव तरुणीची मागील जुलै महिन्यातच फारकत झाली असल्याचे समजते.बेपत्ता तरुणीचे (वय-23 )वर्षे असून रंग-गव्हाळ , उंची-05 फुट 5 इंच, केस-काळे, चेहरा-लांब, डोळे-मोठे व काले, अंगात- पंजाबी ड्रेस, पायात चप्पल, बोली भाषा-मराठी असे वर्णन आहे.वरील वर्णनाची तरुणी आढळून आल्यास पाचोरा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.





