जिल्हा संघात सब ज्युनिअर बॉल बॅडमिंटन राज्य स्पर्धेसाठी जवाहर हायस्कूल गिरडच्या विद्यार्थ्यांची निवड.

भडगाव-
भडगाव तालुक्यातील गिरड येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड शाळेचे विद्यार्थी सब ज्युनियर बॉल बॅडमिंटन राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात या शाळेच्या पाच विद्यार्थी व पाच विद्यार्थिनींची निवड झाली असून सदर स्पर्धा १७ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान या कालावधीत राहुरी अहिल्यानगर कृषी विद्यापीठ येथे होणार आहेत. त्यांच्या ह्या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील, संस्थेचे सचिव प्रशांतराव विनायकराव पाटील, संस्थेच्या व्हाईस चेअरमन डॉ. पुनम ताई प्रशांतराव पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एस पी पाटील, शाळेचे उपमुख्याध्यापक बी एन पाटील, शाळेचे पर्यवेक्षक एन व्ही सावंत, यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक अमित पाटील व निलेश मोरे यांचे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या ह्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





