२४ वर्षाच्या देशसेवेनंतर भातखंडे येथील सैन्य दलातील जवान विजय पाटील सेवानिवृत्त

भडगाव-
भडगाव तालुक्यातील भातखंडे बु.येथील सैन्य दलातील जवान विजय रमेश पाटील हे २४ वर्षाच्या देश सेवेनंतर भातखंडे येथील आपल्या मायदेशी सुखरूप सेवा पूर्ण करून घरी आले. ते ६ ऑगस्ट २००१ ला जळगावला मुंबई बी आर ओ च्या रॅली भरती मध्ये सोल्जर जीडी पदासाठी निवड झाल्यावर गया बिहार ए एस सी (आर्मी सर्विस क्वार्प्स) सेंटर ना्र्थला बेसीक व सर्व प्रकारच्या हलक्या व अवजड आर्मी वाहनांचे ड्रायव्हिंगचे टेक्निकल ट्रेनिंग घेतले त्याच्यानंतर ५०२ ए एस सी बटालियन आसाम (दिनजान ), ५०११ए एस सी बटालियन जालंधर पंजाब, ५५ राष्ट्रीय रायफल्स पुलवामा आणि ५२७१ ए एस सी बटालियन जम्मू आणि काश्मीर, ५ एअर फार्मशन पोस्टल युनिट अलाहाबाद,५२२ ए एस सी बटालियन मेरठ उत्तर प्रदेश, ५१३३ ए एस सी बटालियन सीलीगुडी वेस्ट बंगाल ,५२२१ ए एस सी बटालियन भोपाल मध्य प्रदेश येथून २४ वर्षे देशसेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. नंतर ते प्रथमतः पाचोरा येथील रेल्वे स्थानकावर आले येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर ते आपल्या गावातील अश्रुट पुतळा छत्रपती शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे त्यांनी माल्यार्पण करून दर्शन घेतले येथील श्रीकृष्ण मंदिरात जाऊन देखील त्यांनी दर्शन घेतले यावेळी गावातील ग्रामस्थ व नागरिकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी मान्यवरांनी सत्कार केला.





