मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यास केली चार तासात अटक, गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी..

पाचोरा-
गुन्हे शोध पथकाने चोरीस गेलेली मोटरसायकल सह ४ तासात मुद्देमालासह आरोपीस अटक केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १३.३० वाजे दरम्यान फिर्यादी नामे मनोज डिगंबर जाधव, वय. ३० वर्षे, धंदा. मेडीकल, रा. भोजे चिंचपुरे, ता. पाचोरा, जि. जळगांव हे जारगांव चौफुली येथे त्यांची बजाज कंपनीची काळया रंगाची प्लॅटीना मो.सा. क्रमांक MH-19 CP-0869 ही पार्क करुन फळ घेणेसाठी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने वरील मोटार सायकल ही चोरी करुन घेवुन गेले.याबाबत पाचोरा पोलीस ठाणे येथे गु.रजि.क्रमांक ५१२/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी १५.०१ वा. दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यांचे अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.हे.कॉ.राहुल काशिनाथ शिंपी, पो.कॉ.योगेश सुरेश पाटील, पो.कॉ.शरद मांगो पाटील, पो.कॉ गणेश प्रल्हाद कुवर, पो.कॉ.श्रीराम अनिल शिंपी यांनी सीसीटीव्ही फुटेज व गुन्ह्यांचे तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तसेच गुन्ह्याचा तपास चालु असतांना संशयीत इसम हा कृष्णापुरी परीसरात फिरत असल्याबाबत गुप्त बातमीदाराने पो.कॉ. योगेश सुरेश पाटील यांना माहिती दिल्याने कृष्णापुरी येथे जावुन दबा धरुन बसले असता एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, गाव विचारता त्याने त्याचे नाव भगवान लक्ष्मण पाटील, वय. ३५ वर्षे, रा. पिंप्री खुर्द प्र. ता. पाचोरा, जि. जळगांव असे सांगुन त्यास विश्वासात घेवुन पोलीस ठाणे येथे आणुन त्याची गुन्हा संदर्भात प्राथमिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करुन तपासात त्याने गुन्ह्यात चोरलेली ४५,०००/-रुपये किंमतीची एक बजाज कंपनीची काळया रंगाची प्लॅटीना मो.सा. क्रमांक MH-19 CP-0869 ही त्याने चोरी केल्याचे कळविल्याने त्याचेकडुन वरील मोटार सायकल ही हस्तगत करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ. राहुल शिंपी हे करीत आहेत.सदरची कामगिरी वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पो.हे.कॉ.राहुल शिंपी, पो.कॉ.योगेश पाटील,शरद पाटील,गणेश कुवर श्रीराम शिंपी यांनी पार पाडली आहे.





