GNM नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

पाचोरा-
राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलीत नानासो नरहर न.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग (GNM)पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा जि.जळगाव २०२४,२०२५ प्रथम वर्ष बॅच च्या विद्यार्थी प्रथम क्र. जयश्री शांताराम सपकाळे द्वितीय क्र. समीर अशोक शिंदे, तृतीय क्र. रहीमखा मानखा तडवी यांनी घवघवीत यश प्राप्त करून महाविद्यालयाचा सन्मान वाढवला.

या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष विकास विठ्ठल लोहार व संस्थेचे ट्रस्टी डॉ. विजय नरहर पाटील वृंदावन हॉस्पिटल संचालक पाचोरा व व्हॉइस प्रिन्सिपल मयूर पारखे आचार्य,संदीप खंडारे आचार्य वृंद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विशेष बाब म्हणजे आम्ही सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी असुन नियमित होणारे लेक्चर व संलग्नित हॉस्पिटल,वृंदावन हॉस्पिटल पाचोरा येथे प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या सहजरीत्या सोडवण्यास मदत होते कारण विद्यार्थ्यांच्या समस्या थेट ज्या-त्या विषयाच्या आचार्य आणि तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सहजरीत्या सोडवल्या जातात. म्हणून विद्यार्थ्यांना सहज सोपे होते. असे यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.




